Jalgaon: अधीक्षक कार्यालयात ‘फुकट फौजदार’ वाढले! टंगळमंगळ करणारे मजेत, प्रामाणिकांवर भार; दांडीबहाद्दर ‘बाबुगिरी’ला एसपींचा दणका

Latest Jalgaon News : शासनाचा पूर्ण पगार घेऊन खासगी कामांसाठी बाहेर हिंडत असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आले असून, अशा कर्मचाऱ्यांसाठी लेखी फर्मान काढून त्यांना सक्तीने हजर राहण्याबाबत वदवून घेण्यात आले आहे.
Office of the District Superintendent of Police
Office of the District Superintendent of Policeesakal
Updated on

जळगाव : पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत विविध शाखांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये हजेरी टिपून फरार राहणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. सकाळी १५ ते २० मिनिटे अन्‌ सायंकाळी १५ ते २० मिनिटे टंगळमंगळ करून ही मंडळी पसार होते.

शासनाचा पूर्ण पगार घेऊन खासगी कामांसाठी बाहेर हिंडत असल्याचे पोलिस अधीक्षकांच्या निदर्शनास आले असून, अशा कर्मचाऱ्यांसाठी लेखी फर्मान काढून त्यांना सक्तीने हजर राहण्याबाबत वदवून घेण्यात आले आहे. (Free police increased in Superintendent)

जिल्‍हा पोलिस अधीक्षक कार्यालय हे संपूर्ण जिल्ह्यातील पोलिसदलाचे प्रमुख कार्यालय आहे. स्वागत कक्षासह या कार्यालयात होम डीवायएसपी कार्यालय, स्थानिक गुन्हे शाखा, जिल्हा विशेष शाखा, अर्ज शाखा, कार्यालयीन प्रभारी, बिनतारी संदेश, दहशतवाद विरोधी कक्ष, नियंत्रणकक्ष असे विविध विभाग असून, प्रत्येक विभागाचे प्रभारी अधिकारी नियुक्त आहेत.

केव्हा, कोणत्या शाखेच्या कोणत्या कर्मचाऱ्याची गरज पडेल, हे सांगता येत नाही. असे असताना एकेका विभागातील निम्मे कर्मचारी दररोज कामाच्या वेळेत बेपत्ता असल्याचे आढळून आले आहे. गजर पडल्यावर अधीक्षकांकडून बोलावणे झाले तर, संबंधित व्यक्ती कुठेतरी बाहेर गेल्याचे उत्तर येते. बोलावणं झाल्यावर त्याच्यासोबत काम करणारे त्याला फोन लावतात मग तो, केव्हा तरी हजर होतो. या मुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांचा वेळ वाया जातो. वेळेत कामे पूर्ण होत नसल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे.

‘बाबुगिरी’चा उपद्रव

पोलिस अधीक्षक कार्यालयांतर्गत कार्यरत बॅक ऑफिस अर्थात विविध टेबलांवर नियुक्त कर्मचाऱ्यांनी संगनमत करून घेतले आहे. दहा कर्मचारी नियुक्तीला असतील तर त्या जागी चार-पाच हजर असतात. बाकीचे बायोमेट्रीक पंच करून कामाच्या वेळेत फरार होतात.

ऐन सायंकाळी जाण्याच्या वेळेस अवतरून पुन्हा बायोमेट्रिक करुन निघून जातात. असे वर्षेनुवर्षे सुरू आहे. या अगोदर पोलिस अधीक्षक दत्ता शिंदे यांनी या ‘बाबुगिरी’ला चाप लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, काही दिवसातंच त्यांची बदली झाल्याने पुन्हा ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाली आहे. (latest marathi news)

Office of the District Superintendent of Police
Washim : सीईओ वाघमारे यांची बदली नाही...वाशीमकरांना दिलासा, आंदोलकांकडून आंदोलन तात्पुरते स्थगित

कामचुकारांच्या लपण्याची ठिकाणे

पोलिस दलात कार्यरत असलेल्या शिस्तबद्ध पोलिस कर्मचाऱ्यांनाही बाबुगिरीचे संक्रमण झाले आहे. पोलिस ठाण्यांत थारा बसला नाही किंवा मनासारखी बदली झाली नाही की, अधीक्षक कार्यालयातील विविध साइड ब्रांचला असरा घ्यायचा, हजेरी लावून पगार लाटायचा बहुतांश शाखांमध्ये हेच पोलिस म्हणून भरती झालेले कर्मचारी कार्यरत आहेत, पण त्यांनाही या बाबुगिरीने पछाडले असून, ऐन कामाच्या वेळेत ही मंडळी कुठेतरी टंगळमंगळ करत असते. कामचुकार पोलिसांनी या ‘साइड ब्रांच’मध्ये लपण्याची ठिकाणे बनवून घेतली आहे.

प्रामाणिक कर्मचाऱ्यांची मरणूक

कुठेतरी मंत्री, आमदारांच्या शिफारशीने ‘साईड ब्रांच’मध्ये विसावलेले हे कामचुकार दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करत नाही. परिणामी, त्यांच्या कामाचा अतिरीक्त भार प्रामाणिक कर्मचाऱ्यांवर येऊन त्यांना त्रास सहन करावा लागतो.

..तर शिस्तभंगाची कारवाई

पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अधिनस्थ विविध शाखांतील कर्मचारी व त्यांचे प्रभारी अधिकारी ऐन कामाच्या वेळांमध्ये खासगी कामानिमित्त बाहेर गेल्याचे आढळून आल्याने पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी गुरुवारी (ता. ३) लेखी फर्मान काढून कामाच्या वेळेस गैरहजर आढळून आल्यास शिस्तभंगाच्या कारवाईची ताकीद देण्यात आली आहे.

Office of the District Superintendent of Police
Harshvardhan Patil Tutari: हर्षवर्धन पाटलांनी अखेर तुतारी फुंकली, शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची केली घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com