Current water storage here.esakal
जळगाव
Jalgaon Girna Dam : गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल; पाण्याची आवक सुरूच
Girna Dam : निम्म्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू झाली आहे.
Jalgaon Girna Dam : निम्म्या जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याची व सिंचनाची तहान भागवणाऱ्या गिरणा धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू झाली आहे. धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. सोमवारी (ता. २६) सायंकाळी सहापर्यंत धरणात ७४ टक्के साठा होता. धरणात ४० हजार क्यूसेकने पाण्याचा फ्लो सुरू होता. त्यामुळे गिरणाकाठावरील ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन गिरणा पाटबंधारे विभागाने केले आहे. (Girna Dam to 100 percent full Water continues to flow due to rain in district )

