Gulabrao Patil won Jalgaon Gramin Assembly Election 2024 Result: जळगाव ग्रामीण विधानसभेत मंगुलाबराव पाटील विजयी, देवकरांचा धुव्वा

Gulabrao Patil won Jalgaon Gramin Assembly Election 2024 Result: जळगाव ग्रामीण विधानसभेत मंगुलाबराव पाटील विजयी, देवकरांचा धुव्वा

Jalgaon Gramin Assembly Election 2024 result Maharashtra Vidhan Sabha Nikal: गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिल्याने मराठा समाज नक्की कोणाला कौल देतो हे पाहणं उत्सुकतेच असणार आहे.
Published on

जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार मंत्री गुलाबराव पाटील यांनी माजी मंत्री गुलाबराव देवकर यांचा पराभव केला. मंत्री गुलाबराव पाटील हे ५९ हजार १३० च्या फरकाने ते विजयी झाले. त्यांना १ लाख ४२ हजार ५९१ मतं मिळाली

जळगाव जिल्ह्यातील किंबहुना उत्तर महाराष्ट्रातील एक महत्त्वाची लढत म्हणून बघितली जाणारी जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष विरुद्ध एकनाथ शिंदे शिवसेना अशी थेट लढत झाली. 2019 साली या ठिकाणी मंत्री गुलाबराव पाटील हे तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आले होते.

यावेळी शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे मोठ्या प्रमाणावर शिवसैनिक हे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात काम करत असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे शरद चंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गुलाबराव देवकर यांना उमेदवारी दिल्याने मराठा समाज नक्की कोणाला कौल देतो हे पाहणं उत्सुकतेच होतं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com