Jalgaon News : चाळीसगावातील नुकसानग्रस्तांना 6 कोटी 38 लाखांचे अनुदान मंजूर

Jalgaon : नुकसानीची भरपाई मिळवून देण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश आले आहे. त्यांच्याच एकमेव प्रयत्नातून ६ कोटी ६८ लाखांचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले आहे.
Money
Moneyesakal

Jalgaon News : तालुक्यात ऑगस्ट व सप्टेंबर २०२१ मध्ये अतिवृष्टी, महापूर व ढगफुटी झाली होती. ज्यात अनेक दुकाने, घरांची पडझड होऊन गुरांचा मृत्यू झाला होता. सुमारे १५ हजार ८०० हेक्टर क्षेत्रावरील पिके अक्षरशः वाहून गेली होती. या नुकसानीची भरपाई मिळवून देण्यात आमदार मंगेश चव्हाण यांना यश आले आहे. त्यांच्याच एकमेव प्रयत्नातून ६ कोटी ६८ लाखांचे अनुदान शासनाकडून मंजूर झाले आहे. (Jalgaon Grant of 6 crore 38 lakhs approved to victims of Chalisgaon)

शहरासह तालुक्यात ऑगस्ट २०२१ महिन्याच्या शेवटी व पुन्हा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी झाली होती. त्यामुळे पाटणादेवी अभयारण्य क्षेत्रासह गिरणा- मन्याड धरण क्षेत्रात जवळपास एका रात्रीत १४० मिलिमीटर पाऊस झाला होता.

या महापुरात २ हजार ६६० गुरे दगावली होती. तर ११ हजार २३१ कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. शिवाय २ हजार २५० घरे व दुकानांचे कमी अधिक प्रमाणात नुकसान झाले होते. अचानकपणे आलेल्या या महापुरामुळे अनेक घरांमध्ये पाणी साचून ग्रामीण भागात नदी किनारी असलेली शेकडो हेक्टर जमिन खरडून गेली होती.

या महापूरग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांचा राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून नुकताच राज्य शासनातर्फे अनुदान मंजूर झाल्याचा शासन निर्णय प्रकाशित झाला आहे.

त्यात चाळीसगाव मतदारसंघासाठी ६ कोटी ३८ लाख रुपयांची नुकसान भरपाई मिळणार आहे. यामुळे दुष्काळाच्या गर्तेत असणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील महापूरग्रस्तांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी राज्य शासनासह आमदार मंगेश चव्हाण यांचे आभार मानले आहेत. (latest marathi news)

Money
Jalgaon News : ठाण्याच्या नाट्यकलावंत तरुणीने मानले आभार; रिक्षाचालकामुळे महागडा मोबाईल मिळाला परत

पाठपुराव्याला यश

या संदर्भात माहिती देताना आमदार मंगेश चव्हाण यांनी सांगितले, की ऑगस्ट २०२१ मध्ये झालेल्या महापुरानंतर प्रत्येक गावाला भेट देऊन पंचनामे केले होते. ज्यांची घरे वाहून गेली होती, त्यांना तात्पुरते घर मी स्वखर्चाने उभारून दिले होते. दोन वर्षांपासून मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे प्रलंबित होता.

अखेर माझ्या पाठपुराव्याला यश आले असून जीवितहानी, पशुधन हानी, घर, गोठा, संसारोपयोगी साहित्य अशी वित्तहानी झालेल्या महापूरग्रस्तांना ६ कोटी ३८ लाख निधी प्राप्त झाला आहे. लवकरच ही मदत त्यांच्या खात्यात जमा केली जाईल.

याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मी आभार मानतो, असे त्यांनी सांगितले.

"कोणत्याही संकटात मी चाळीसगाववासीयांना एकटे सोडणार नाही. राज्य शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी मी कटीबद्ध राहील हा विश्वास यानिमित्ताने देतो."- मंगेश चव्हाण, आमदार ः चाळीसगाव

Money
Jalgaon News : केंद्राच्या OBC यादीत गुर्जर, पोटजातींना घ्यावे; खासदार रक्षा खडसे यांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com