
Jalgaon Heavy Rain : शहरासह जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पाऊस होत आहे. यामुळे नद्या, नाले पुन्हा वाहू लागले आहेत. शुक्रवारी (ता. २३) रात्री व शनिवारी (ता. २४) दिवसभर शहरात पावसाची रिपरिप सुरू होती. कधी हळूवार, तर कधी धुव्वाधार पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसाच्या व्यत्ययामुळे जळगाव शहरात शनिवारी आठवडे बाजारही भरू शकला नाही. गेल्या बुधवारपासून शहरासह जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी सुरू आहे. (Heavy rains have been in city and district since Wednesday )