Road Accident News | जळगाव महामार्गावर सुसाट वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Road Accident

जळगाव महामार्गावर सुसाट वाहनाने दुचाकीस्वारास चिरडले

जळगाव : भरधाव चारचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगाव-भुसावळ महामार्गावर बुलेट शोरूमसमोर रविवारी (ता. २७) रात्री साडेबाराच्या सुमारास घडली.

सागर विजय राणे (वय ३०, रा. हिंगोणा, ता. यावल) नोकरीनिमित्त जळगावात राहतो. शनिवारी (ता. २६) सायंकाळी तो दुचाकीने हिंगोणा येथे घरी गेला होता. त्यानंतर रात्री दुचाकीने परत जळगावला जात असताना रात्री साडेबाराच्या सुमारास जळगाव-भुसावळ मार्गावरील बुलेट शोरूमच्या समोरून शहरात येत असताना अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली.

या धडकेत सागर जागीच ठार झाला. यासंदर्भात एमआयडीसी पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह जिल्हा शासकीय महाविद्यालयात आणला. त्यानंतर शवविच्छेदन करून नातेवाइकांकडे मृतदेह देण्यात आला.

एकुलता एक मुलगा गेल्याने राणे कुटुंबीयांनी आक्रोश केला. शरद रमेश जावळे (वय ४६, रा. रोझोदा, ता. रावेर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल झाला. पोलिस उपनिरीक्षक नीलेश गोसावी अधिक तपास करीत आहे.