Jalgaon: घरगुती सिलेंडरवरील अनधिकृत गॅस पंपावर धाड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गॅस!
घरगुती सिलेंडरवरील अनधिकृत गॅस पंपावर धाड

जळगाव : घरगुती सिलेंडरवरील अनधिकृत गॅस पंपावर धाड

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : गॅसवर चालणाऱ्या वाहनांमध्ये अवैधरीत्या घरगुती गॅस भरून देण्याचा गोरख धंदा करणाऱ्या दोघांना सहाय्यक पोलिस अधीक्षकांच्या पथकाने अटक केली. छाप्यानंतर शहरातील इतर धंदेवाल्यांनी सावध भूमिका घेत धंदा आवरल्याची माहिती समोर आली.

शहरातील मास्टर कॉलनी परिसरात घरगुती सिलिंडरमधील गॅस बेकायदेशीर वाहनांमध्ये भरून विकला जात असल्याची गुप्त माहिती सहायक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा यांना मिळाली होती. त्यांच्या पथकासह पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सहाय्यक निरीक्षक प्रमोद कठोरे, महेंद्र वाघमारे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, मिलिंद सोनवणे, गणेश शिरसाळे, सलीम तडवी, रवींद्र मोतीराया, महेश महाले, समाधान पाटील अशांच्या पथकाने धाव घेत छापा टाकला. त्यावेळी सिराज खान रज्जाक खान ऊर्फ शेराखान (वय- ३०, रा. मास्टर कॉलनी) व त्याचा साथीदार जहाँगीर रफिक पटेल (वय- ४४, रा. सदाशिवनगर शेराचौक) अशा दोघांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा: एक कॅच सुटला अन् पाकिस्तानचं झालं T20 वर्ल्ड कपमधून 'पॅक-अप'

२८ सिलिंडर व पंप जप्त या कारवाईत रोख रक्कम १९२० रुपयांसह गॅसचे चार भरलेले चोवीस रिकामे सिलिंडरसह इलेक्ट्रॉनिक वजन काटा, सिलिंडरमधून गॅस ओढून वाहनात भरण्यासाठीचा खास पंप (मशिन) असा एकूण ६८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सिराजखान रज्जाक खान उर्फ शेराखान व जहांगीर रफीक पटेल या दोघांना अटक करण्यात आली आहे.

loading image
go to top