Girna River sand mafia latest news
esakal
जळगाव : तालुक्यातील दापोरा येथून वाहणाऱ्या गिरणा नदीपात्रातून बेकायदा वाळू उत्खनन करून ती शिरसोलीमार्गे वाहतूक केली जाते. शनिवारी (ता. २७) रात्री वाळूच्या डंपरचा पाठलाग करणाऱ्या महसूल विभागाच्या पथकासमोर सुसाट कार आडवी उभी (Girna River illegal sand transportation) करून डंपर पळवून नेले. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.