जळगाव : विकासकामांतून भक्कम नेतृत्वाचा ठसा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : विकासकामांतून भक्कम नेतृत्वाचा ठसा

जळगाव : विकासकामांतून भक्कम नेतृत्वाचा ठसा

sakal_logo
By
- संजय पाटील

जळगाव (पारोळा) : (कै.) आमदार आप्पासाहेब भास्करराव पाटील व माजी पालकमंत्री अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील यांच्या संस्कारातून तामसवाडी - देवगाव जिल्हा परिषद गटातून राजकारणाचा श्रीगणेशा करणारे दर्यादिल नेतृत्व दादासाहेब रोहन सतीश पाटील यांच्या विकासकामांची गाथा निश्चितच राजकारणाच्या इतिहासात कौतुकास्पद आहे.

जिल्हा परिषद गटात गेल्या साडेचार वर्षांपासून गरजू कामांना न्याय देण्याचा प्रयत्न करीत शेष फंड, जिल्हा नियोजन यातून जास्तीत जास्त निधी आपल्या गटात आणून विकासकामे मार्गी लावण्याचा प्रयत्न रोहन पाटील यांनी केला. मितभाषी स्वभाव, सतत हसतमुख चेहरा, निगर्वी, निर्व्यसनी व सदैव उदारता या गुणवैशिष्ट्यांमुळे रोहन पाटील युवकांचे श्रद्धास्थान बनले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही.

मतदार संघ टँकरमुक्त व्हावा, यासाठी (कै.) माजी आमदार भास्करराव पाटील यांनी बोरी धरणाची निर्मिती केली. संपूर्ण जळगाव जिल्हा पाणीदार व्हावा, जिल्हा नदी-नाल्यांनी ओसंडून निघावा, या उदात्त भावनेतून माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी नदीजोड प्रकल्प आणला. आणि त्याच पार्श्वभूमीवर हा विकासाचा भगीरथ यशस्वी करण्याचे काम आपल्या जिल्हा परिषद गटात रोहन पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. तामसवाडी - देवगाव गटात मूलभूत कामांना न्याय मिळत आहे. आपल्या गटात मूलभूत योजना राबविल्या जाव्यात. यासाठी रोहन पाटील यांनी वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या बैठकीत अनेकदा विविध विषय बैठकीत मांडून योजनेला न्याय देण्याचा प्रयत्न केला. गावपातळीवरील रस्ते, तामसवाडी भागातील नाथबाबा मंदिराजवळील के.टी. वेअर बंधारा, करमाड, मुंदाणे गावाचा रस्ता, देवगाव - सावरखेडे रस्त्यावरील मोरीचे काम, विविध रस्त्यावर खडीकरण, तामसवाडी फिल्टरेशन प्लांट दुरुस्ती, विविध शाळा इमारतींची दुरुस्ती यासह विविध कामांना न्याय देण्याची भूमिका रोहन पाटील यांनी घेतल्याने ग्रामीण भागात त्यांचे ग्रामस्थांसह शेतकरी कौतुक करताना दिसतात.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

विद्यार्थी हिताचा विचार

समाजकारणातून माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राजकारण सांभाळताना मतदार संघात विद्यार्थ्यांच्या हितासाठी रोहन पाटील यांनी बसचे पासेस मिळण्यासाठी केलेले आंदोलन, वाघरे (ता. पारोळा) येथील अण्णासाहेब डॉ. सतीश पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण, तर किसान महाविद्यालय येथे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना अल्प शुल्क आकारणी करण्याचे सांगून त्यांना प्रवेश मिळणे कामी सहकार्य, युवकांच्या न्याय हक्कासाठी नेहमी रस्त्यावर येऊन रोहन पाटील यांनी नेतृत्व स्वीकारून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पक्षीय मेळावे, रक्तदान शिबिरे, पक्षाच्या अनेक कार्यक्रमात युवकांच्या माध्यमातून नेतृत्व करून नेहमीच दिलेला शब्द पाळणारे रोहन पाटील यांच्याकडे युवक आशेने पाहात आहेत.

कोरोना काळात देखील डॉ. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद सदस्य रोहन पाटील यांनी शहर व तालुक्यात अनेक गरजूंना मदत करून आपला सेवाभाव जोपासला आहे. तसेच मतदारसंघातील महिलांना उज्ज्वला गॅस योजनेतून मोफत जोडणी देऊन अनेक महिलांना लाभ मिळवून देत मानस गॅसच्या एजन्सीच्या माध्यमातून ते सेवा देत आहेत.

loading image
go to top