.jpg?rect=0%2C0%2C1200%2C675&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
Jalgaon Dam Storage : जिल्ह्यात आतापर्यंतच्या सरासरीपेक्षा १३० टक्के पाऊस झाला आहे. नदी, नाले खळाळल्यामुळे भूजलपातळीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लहान व मोठे मध्यम प्रकल्प ओसंडले आहेत. यामुळे ७४.२६ टक्के उपयुक्त जलसाठा झाला आहे. आगामी रब्बी हंगामासाठी सिंचनाची चिंता मिटली आहे. जळगाव जिल्ह्यात अल्प मान्सूनमुळे हतनूर व वाघूर वगळता गिरणा प्रकल्पात ५७ टक्के साठा होता. ( In irrigation projects 74 percent of stock irrigation concerns were cleared )