Jalgaon Infrastructure Boost White Topping for Four-Lane Highway
sakal
जळगाव - एकीकडे शहरातील चौपदरी महामार्गाचा देखभाल दुरुस्ती दायित्व कालावधी (डिफेक्ट लायबलिटी पीरेड) संपत असताना या रस्त्याच्या मजबुतीकरणासाठी त्यावर ‘व्हाइट टॉपिंग’ करण्यात येणार आहे. त्यासाठी ७२ कोटींच्या खर्चाची निविदा मंजूर करण्यात आली असून, या महामार्गावर ज्या भागात पाणी साचते, त्याठिकाणी ड्रेनेजचे कामही केले जाईल. गिरणा नदीवरील पुलाला समांतर पुलाचे कामही यात समाविष्ट आहे.