Jalgaon KBCNMU News : ‘रसायनशास्त्रातील जागतिक संधी’वर आंतरराष्ट्रीय परिषद; ‘उमवि’त 18, 19 ला आयोजन

Jalgaon : ‘रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानातील नवीनतम विकासासाठी जागतिक संधी (GOLD CT)’ या विषयावर दुसरी अंतरराष्ट्रीय परिषद होणार असून, यामध्ये सहाशेपेक्षा अधिक संशोधक, तज्ज्ञ, उद्योजक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत.
KBCNMU
KBCNMUesakal
Updated on

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या रसायनशास्त्र प्रशाळेच्या वतीने १८ व १९ सप्टेंबरला ‘रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञानातील नवीनतम विकासासाठी जागतिक संधी (GOLD CT)’ या विषयावर दुसरी अंतरराष्ट्रीय परिषद होणार असून, यामध्ये सहाशेपेक्षा अधिक संशोधक, तज्ज्ञ, उद्योजक व विद्यार्थी सहभागी होणार आहेत. रसायनशास्त्र प्रशाळेतील प्रोफेसर तथा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरु प्रा. पी. पी. माहुलीकर हे सप्टेंबर महिन्याअखेर सेवानिवृत्त होत असून त्यांच्या सेवेचा गौरव करण्यासाठी ही आंतरराष्ट्रीय परिषद होणार आहे. (International Conference on Global Opportunities in Chemistry held at kbcnmu on 18 and 19 september )

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com