Jalgaon ITI Student Death News Maharashtra
esakal
जळगाव : शासकीय सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या रोहित समाधान पवार (वय १८, रा. निंभोरा, ता. धरणगाव) या विद्यार्थ्याने मंगळवारी (ता. १७) दुपारी राहत्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या (18-Year-Old ITI Student Dies) केली. त्याचे वडील रोहितला भेटून ख्याली खुशाली घेऊन गावी परतले अन् मुलाने आत्महत्या केल्याचे वृत्त त्यांच्या कानी पडल्याने पित्यासह कुटुंबीय हादरले.