Raver Lok Sabha Constituency : बालेकिल्ल्यात भाजप उमेदवाराला मताधिक्याची महाजनांची ‘गॅरंटी’

Jalgaon : रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा चांगलाच उडत आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय विचार केला, तर त्यातील जामनेर मतदारसंघात गिरीश महाजनांचे व पर्यायाने भाजपचे गेल्या तीन दशकांपासून वर्चस्व आहे.
Raksha Khadse, Girish Mahajan
Raksha Khadse, Girish Mahajanesakal

प्रल्हाद सोनवणे : सकाळ वृत्तसेवा

जामनेर : रावेर मतदारसंघातील महत्त्वाच्या जामनेर विधानसभा क्षेत्रात गेल्या ३० वर्षांपासून भाजपचेच निर्विवाद वर्चस्व राहिले आहे. सहा टर्मपासून गिरीश महाजन सलग निवडून येत असून, त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी संजय गरुडही भाजपवासी झाल्याने महाजनांना विरोधकच शिल्लक नाही, अशी स्थिती आहे. (Raver Lok Sabha Constituency)

त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात भाजप- महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसेंना मताधिक्याची महाजनांचीच ‘गॅरंटी’ असल्याचे मानले जात आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा चांगलाच उडत आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय विचार केला, तर त्यातील जामनेर मतदारसंघात गिरीश महाजनांचे व पर्यायाने भाजपचे गेल्या तीन दशकांपासून वर्चस्व आहे.

महाजन याठिकाणी सातत्याने सहा टर्मपासून निवडून येत आहेत. केवळ विधानसभेलाच नव्हे, तर जामनेर पालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचे सर्व गट, ९० टक्क्यांहून अधिक ग्रामपंचायती, अशा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही भाजपचे वर्चस्व आहे. विरोधक या तालुक्यात नावालाही नाही.

एकमेव गरुडही भाजपवासी

महाजनांचे कट्टर प्रतिस्पर्धी म्हणून संजय गरुड यांनी प्रत्येक विधानसभेला व अन्य निवडणुकांप्रसंगी महाजनांसमोर आव्हान उभे केले. काही वेळा हे आव्हान कडवे होते, तर काही प्रसंगी ते कमकुवत ठरले. कडव्या आव्हानातही महाजनांनीच या मतदारसंघात वर्चस्व राखले. महाजनांचे विरोधक असलेले संजय गरुडच दोन महिन्यांपूर्वी भाजपत आले आहेत. त्यामुळे उरलासुरला विरोधही संपल्यात जमा असल्याचे बोलले जातेय. (Latest Marathi News)

Raksha Khadse, Girish Mahajan
Jalgaon Loksabha Election 2024 : भाजपच्या उमेदवारीवरुन आदळआपट.. महायुतीत मिठाचा खडा!

पवारांचा पहिलाच मेळावा

महाजन व भाजपच्या या गडात राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मतदारसंघातील पहिलाच मेळावा थेट जामनेरात घेतला. मेळाव्यात पवारांनी स्थानिक मुद्यांपेक्षा राज्य व देशाच्या मुद्यांवर फोकस करत मोदींवरही टीका केली.

मात्र, राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांनी महाजनांवर टीका केल्याचे दिसून आले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाने जामनेरपासूनच प्रचाराला बळ देण्याची सुरवात केल्याचे दिसते. त्याचा मतदारसंघातील मतदारांवर कसा परिणाम होतो, हे बघावे लागेल.

महाजनांची ‘गॅरंटी’

या मतदारसंघातील जातीय समीकरणात मराठा समाजाचे प्राबल्य आहे. जवळपास ४० टक्क्यांहून अधिक मराठा समाज असला, तरी या क्षेत्राने नेहमीच अल्पसंख्याक असलेल्या महाजनांना निवडून दिले आहे. महाजनांना निवडून देताना इथल्या जनतेने कधीही जात-पातीचा विचार केला नाही. त्यामुळे महाजन रक्षा खडसेंना आपल्या बालेकिल्ल्यातून मताधिक्य देण्यात कमी पडणार नाही किंबहुना त्यांना ते द्यावेच लागेल. ते मंत्री असल्याने त्यांच्यासाठीही मताधिक्य देणे प्रतिष्ठेचे असून, त्यांनी त्याची ‘गॅरंटी’ घेतल्याचे चित्र दिसतेय.

Raksha Khadse, Girish Mahajan
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com