

Jalgaon News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत जळगावात लखपती दीदी संमेलन झाले. संमेलनासाठी बचत गटांच्या महिलांना आणण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बस बुकिंग केल्या होत्या. यामुळे महामंडळाला साधारण ८ कोटींचे उत्पन्न मिळाले. मात्र, बुकिंग केलेल्या बसचा परिणाम दुसऱ्या दिवशीही पाहावयास मिळाला. प्रवाशांना दुसऱ्या दिवशीही ‘एसटी’ची वाट पाहावी लागत होती. (Lakhpati Didi made MSRTC millionaire)