Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

Jalgaon News : विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील. या मतदारसंघाने गेल्या तीन टर्ममध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या व्यक्तींना निवडून दिले.
Anil Patil and former MLA Shirish Chaudhari participated in the campaign rally for Mahayuti candidate Smita Wagh.
Anil Patil and former MLA Shirish Chaudhari participated in the campaign rally for Mahayuti candidate Smita Wagh.esakal

आर. जे. पाटील : सकाळ वृत्तसेवा

अमळनेर : विधानसभा मतदारसंघ राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील. या मतदारसंघाने गेल्या तीन टर्ममध्ये तीन वेगवेगळ्या पक्षांच्या वेगवेगळ्या व्यक्तींना निवडून दिले. त्यातीलच माजी आमदार शिरीष चौधरी व विद्यमान आमदार तथा मंत्री अनिल पाटील. एकमेकांचे कट्टर विरोधक. (Jalgaon Lok Sabha Constituency)

पण, गेल्या काही वर्षांतील बदललेले राजकारण आणि या वेळच्या लोकसभा निवडणुकीने या दोघा विरोधकांना एकत्र आणलंय. परवाच्या रॅलीत दोघेही दादा ‘ताई’ अर्थात, भाजप- महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्यासाठी एकत्र आलेत. जळगाव लोकसभेच्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी संपूर्ण लोकसभा मतदारसंघात प्रचाराची आघाडी घेतली आहे.

मात्र स्वतःच्या अमळनेर तालुक्यात महायुतीच्या नेत्यांमध्ये विसंवाद दिसत होता. अमळनेरात झालेल्या महायुतीच्या मेळाव्याला महायुतीचे घटकपक्ष एकत्र आले पण त्याच वेळी या मेळाव्याला माजी आमदार शिरीष चौधरी यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती.

अमळनेरला गैरहजेरी, जळगावात उपस्थित

अमळनेरात महायुतीच्या व्यासपीठावर न येऊ शकलेले शिरीष चौधरी जळगावला उमेदवारी दाखल करण्यासाठी आयोजित मेळाव्याला राज्याच्या प्रमुख नेत्यांच्या गराड्यात मात्र पुढे होते.त्यामुळे शिरीष चौधरी पहिल्यांदा महायुतीच्या व्यासपीठावर आल्याने ते स्मिता वाघ यांच्यासाठी सक्रिय झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. मात्र अमळनेरात त्यांचे विरोधक व राज्यात मंत्री असलेले अनिल पाटील आणि माजी आमदार शिरीष चौधरी एकत्र येतील का हा मोठा प्रश्न अमळनेरकरांना पडलेला होता. (Latest Marathi News)

Anil Patil and former MLA Shirish Chaudhari participated in the campaign rally for Mahayuti candidate Smita Wagh.
Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

अखेरीस दोन्ही दादा एकत्र

शेवटी २७ रोजी महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या प्रचाराचा शुभारंभ तसेच प्रचार कार्यालयाच्या उद्‌घाटनावेळी ना. अनिल पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी हे दोन्ही दादा ताईंसाठी एकत्र प्रचार करतांना शहराच्या रस्त्यावर दिसले.

दोन्ही दादांना एकत्र आणण्यात राज्यातील नेत्यांना यश आल्याने ताईंचा मार्ग थोडा का असेना अमळनेरात सुकर झाला असल्याचे बोलले जात असले तरी आता कार्यकर्ते नेत्यांचे किती ऐकतात हे मतपेटीतूनच समजेल.

कृषिभूषण दादा तटस्थ

अमळनेरचे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे अजूनही तटस्थ आहेत. ते ना कुणाचा फॉर्म भरायला गेले, ना कुणाच्या प्रचारासाठी व्यासपीठावर गेले. ‘मी दोघांचा आहे..’ असं चित्र मतदारसंघात त्यांनी तयार केल्यानेच की काय.. त्यांचे फोटो महायुती व महाविकास आघाडी दोघांच्या बॅनरवर पहायला मिळत असून क्रिकेट मधला ‘कॉमन खेळाळू’ सारखी सध्या त्यांची खेळी आहे.

Anil Patil and former MLA Shirish Chaudhari participated in the campaign rally for Mahayuti candidate Smita Wagh.
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com