Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेश पाटलांच्या ‘उबाठा’तील प्रवेशाने जिल्ह्यात समीकरणे बदलणार!

Jalgaon News : लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारी उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना ‘उबाठा’ पक्षात प्रवेश केला.
Uddhav thackeray, Unmesh Patil
Uddhav thackeray, Unmesh Patilesakal

Jalgaon News : लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारल्यानंतर बुधवारी उन्मेश पाटील यांनी खासदारकीचा राजीनामा देत शिवसेना ‘उबाठा’ पक्षात प्रवेश केला. त्याचे जळगाव जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात पडसाद उमटत असताना जळगाव मतदारसंघातून सुरुवातीला स्मिता वाघांना सोपी वाटणारी निवडणूक कठीण झाल्याचे व भाजप- मविआत ‘काटे की टक्कर’ होणार असल्याचे मानले जात आहे. (Jalgaon Lok Sabha Constituency)

दोन आठवड्यांपूर्वी भाजपने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातून अनुक्रमे स्मिता वाघ व रक्षा खडसे यांना उमेदवारी जाहीर केली. भाजपच्या उमेदवारांची घोषणा होऊन दोन आठवडे उलटल्यानंतरही मविआचे या दोन्ही मतदारसंघातील उमेदवार जाहीर होत नव्हते.

जळगाव लोकसभा मतदारसंघात मविआला व ही जागा शिवसेना ‘उबाठा’कडे असल्याने त्यांना उमेदवार शोधावा लागत होता. काही नावांवर चर्चाही झाली, मात्र योग्य व सक्षम नाव समोर येत नव्हते. उन्मेश पाटील यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांची भूमिका काय, हेदेखील समजू शकत नव्हते. त्यामुळे जळगाव मतदारसंघात स्मिता वाघांसमोर उमेदवारही मिळत नाही म्हणून ही निवडणूक एकतर्फी होईल का, अशी चर्चाही सुरु झाली होती.

तुल्यबळ लढत होणार

अखेर बुधवारी उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करीत शिवबंधन हाती बांधले. उद्धव ठाकरे यांनी त्यांचे मातोश्रीवर स्वागत केले. त्यांच्यासोबत पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांनीही ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी बुधवारीच करण पवारांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले.

त्यामुळे आता जळगाव लोकसभेतील समीकरणे बदलली आहेत. करण पवारांच्या उमेदवारीला उन्मेश पाटलांचे पाठबळ लागणार असल्याने ही लढत स्मिता वाघ यांच्यासाठी सहज सोपी राहिलेली नाही. आता दोन्ही उमेदवारांमध्ये तुल्यबळ लढत होईल, असे मानले जात आहे. (jalgaon political news)

Uddhav thackeray, Unmesh Patil
Loksabha Election 2024 : महिला उमेदवारांचा टक्का कमीच ‘यूपी’तील पहिल्या टप्प्यातील स्थिती

मित्रपक्षांच्या मदतीवर उमेदवारांचे भवितव्य

२०१९ पर्यंत भाजप- शिवसेना युतीने महाराष्ट्रात लोकसभा निवडणुका संयुक्तपणे लढविल्या. जळगाव लोकसभा मतदारसंघात सध्या जळगाव शहर व चाळीसगाव वगळता भाजपचे आमदार नाहीत. अमळनेरला अजित पवार गटाचे मंत्री अनिल पाटील, पाचोऱ्यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर पाटील, एरंडोलला शिंदे गटाचे चिमणराव पाटील आमदार आहेत.

म्हणजे, शिवसेनेची ताकद भाजपपेक्षा अधिक. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या शिंदे सेनेच्या व अजित पवार गटातील अनिल भाईदास पाटील यांच्या मदतीवर स्मिता वाघांचा विजय अवलंबून आहे. दुसरीकडे, आता करण पवारांना उन्मेश पाटलांची भक्कम साथ मिळणार, हे पक्के झाले आहे.

शिवाय, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, गुलाबराव देवकर या नेत्यांसह शिवसेना ‘उबाठा’च्या जळगाव शहरातील माजी महापौर, विरोधी पक्षनेते, माजी नगरसेवकांच्या पाठबळावर करण पवारांचे विजयाचे गणित अवलंबून असेल.

Uddhav thackeray, Unmesh Patil
loksabha elections 2024: भाजप मित्रपशांना संपवतंय?, शिंदे गटात अस्वस्थता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com