Jalgaon Lok Sabha: धावपळ टाळण्यासाठी मतदान केंद्रांची माहिती घ्या : जिल्हाधिकारी प्रसाद; QR कोड, संकेतस्थळावर माहिती उपलब्ध

Lok Sabha Election 2024 : मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदान केंद्रांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election esakal

Jalgaon Lok Sabha : जिल्ह्यातील जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (ता. १३) मतदान होणार आहे. मतदानासाठी मतदारयादीत नाव असणे आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी धावपळ टाळण्यासाठी भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरून मतदान केंद्रांची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे. अनेक ठिकाणी फ्लेक्स लावून त्यावर क्यूआरकोड कोड दिला आहे. तो स्कॅन केल्यावरही मतदारांना त्याची माहिती मिळणार आहे, असेही त्यांनी सांगितले. (Jalgaon Lok Sabha election 2024 polling stations news)

जळगाव लोकसभा मतदारसंघात पुरुष मतदार १० लाख ३७ हजार ३५०, महिला मतदार ९ लाख ५६ हजार ६११, तर किन्नर ८५ मतदार, असे एकूण १९ लाख ९४ हजार ४६ मतदार आहेत. तर रावेर लोकसभा मतदारसंघात पुरुष ९ लाख ४१ हजार ७३२, तर महिला मतदार ८ लाख ७९ हजार ९६४, किन्नर ५४, असे एकूण १८ लाख २१ हजार ७५० मतदार आहेत.

ओळख चिठ्ठीचे वाटप

मतदारांना मतदार ओळख चिठ्ठीचे वाटप पूर्ण झाले आहे. मतदार चिठ्ठी मिळाली नसल्यास जवळच्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. जिल्हा निवडणूक प्रशासनाने शहरात वॉर्डनिहाय, तसेच विधानसभा मतदारसंघ स्तरावर मतदार सहाय्यता केंद्र स्थापन केले आहे. (Latest marathi news)

Jalgaon Lok Sabha Election
Dindori Lok Sabha Constituency : मंगळवारपासून दिंडोरीचा राजकीय आखाडा तापणार! महायुती, महाविकास आघाडीचे नेते मतदारसंघात ठोकणार तळ

या केंद्राची मदत घेऊन मतदान केंद्राची माहिती घेता येईल. ॲपवरही सुविधा आहे. पात्र मतदारांनी आपले नाव मतदारयादीत असल्याची खात्री करून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता मतदानाचा पवित्र हक्क बजवावा, असे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

संकेतस्थळावर मतदाराची माहिती

मतदारांच्या सोयीसाठी १९५० हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून दिला आहे. त्यावरून मतदारयादीतील नावाची माहिती घेता येईल. https://electoralsearch. eci.gov.in या संकेतस्थळावरही मतदाराचा तपशील शोधता येणार आहे.

Jalgaon Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : होम वोटिंग करून 107 वर्षांच्या आजी देवा घरी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com