Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव, रावेर लोकसभेच्या मतदानाची जय्यत तयारी! जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Jalgaon News : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ लाख १५ हजार ७९६ मतदार मतदान करतील. जिल्ह्यात एकूण ३ हजार ५८२ मतदान केंद्रे आहेत.
Collector Ayush Prasad
Collector Ayush Prasadesakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या सोमवारी (ता. १३) मतदान होणार आहे. मतदान प्रक्रियेची तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली आहे. जळगाव व रावेर लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ लाख १५ हजार ७९६ मतदार मतदान करतील. जिल्ह्यात एकूण ३ हजार ५८२ मतदान केंद्रे आहेत.

रविवारी (ता. १२) विधानसभा संघनिहाय मतदान यंत्राचे वाटप मतदान कर्मचाऱ्यांना होईल. ते पोलिस बंदोबस्तात नेमलेल्या मतदान केंद्रावर पोचतील, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जळगाव लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी शनिवारी (ता. ११) झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे, पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी या वेळी उपस्थित होते. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Raver Lok Sabha Polling Preparations)

तापमान कमी राहण्याचा अंदाज

जिल्हाधिकारी प्रसाद यांनी सांगितले, की सोमवारी (ता. १३) जिल्ह्याचे तापमान ३९ अंश राहून सावलीचे वातावरण राहील. सध्या ४३ अंश तापमान आहे. त्यादिवशी पाच अंश तापमानात घट होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. यामुळे मतदार मतदानासाठी मोठ्या संख्येने बाहेर पडतील.

होम वोटिंग ९२ टक्के

निवडणूक निर्णय अधिकारी पिनाटे यांनी सांगितले, की जिल्ह्यात होम वोटिंग करण्यासाठी १,५०४ ज्येष्ठ मतदारांनी अर्ज केले होते. त्यापैकी १,३८८ मतदारांनी मतदान केले. त्याचे प्रमाण ९२ टक्के आहे. १२६ मतदारांनी मतदान केले नाही. त्यात कोणी घरी नव्हते, आजारी होते, तर काही मृत आढळले.

फॅसिलेटी सेंटर

सर्व्हिस वोटर ८,४३३ आहेत. त्यांना आपण टपाली मतपत्रिका पाठवितो. ते मतदान करून मतमोजणीपर्यंत ते टपाली मतपत्रिका पाठवतील. मतदान ड्यूटीवर नेमलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांसह इतर कर्मचाऱ्यांसाठी फॅसिलेटी सेंटर प्रत्येक मतदार केंद्रावर दिले आहे. संबंधित कर्मचारी त्यावर जाऊन मतदान करू शकतात.

१९ गुन्हेगारांचे मतदान

ज्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे, जे इतर जिल्ह्यातील तुरुंगात आहेत, अशा २८ गुन्हेगारांना मतदानाची परवानगी होती. त्यापैकी १९ गुन्हेगारांनी मतदान केले आहे. त्यात ठाणे, मुंबई, येरवडा आदी तुरूंगात असलेल्या जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारांचा सामावेश आहे.

मतदान लाईव्ह दिसणार

जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्प बचत भवनात जळगाव व रावेर लोकसभेसाठी प्रत्येकी सहा मोठे स्क्रीन लावून त्या-त्या मतदारसंघात कशा पद्धतीने मतदान सुरू आहे, याचे लाईव्ह चित्रण पाहता येणार आहे. एकूण १२ मोठे स्क्रीन याठिकाणी लागतील.

आरोग्य सुविधांसह पाळणा घर

मतदारांना सर्वच मतदान केंद्रावर आरोग्याच्या सुविधा मिळणार आहे.त लहान मुलांसाठी पाळणा घर असणार आहे. पाण्याची व्यवस्था, बसण्याची सोय असणार आहे. (latest marathi news)

Collector Ayush Prasad
Jalgaon Lok Sabha Election 2024: प्रचार तोफा थंडवल्या, आता प्रतिक्षा मतदानाची! शेवटच्या दिवशी उमेदवारांचा रॅलीवर अधिक भर

आकडे बोलतात..

-वेब कास्टिंग होणारी मतदान केंद्रे : १,९८९

-व्हिडिओ शूटिंग, सीसीटीव्ही असणारे केंद्रे : १,१०७

-मायक्रो आबर्झवर असलेली केंद्रे : ७९०

-आदर्श मतदान केंद्रे : १२१

-लागणारे व्हीव्हीपॅट : ३ हजार ८८६

-कंट्रोल युनिट : ३ हजार ८८६

-जळगाव मतदारसंघासाठी बॅलेट युनिट : १,९८२

-रावेर मतदारसंघासाठी बॅलेट युनिट : ३,८०८

२०१९ ला झालेले मतदान

रावेर लोकसभा : ६०.४० टक्के

जळगाव लोकसभा : ५६ टक्के

ट्रेनिंग व साहित्यवाटप

जळगाव विधानसभा मतदारसंघासाठी एकलव्य क्रीडा संकुलाच्या मैदानावर रविवारी (ता. १२) सकाळी आठपासून निवडणूक कर्मचाऱ्यांचे ट्रेनिंग होईल. दहानंतर मतदान साहित्यवाटप होऊन कर्मचारी पोलिस बंदोबस्तासह मतदान केंद्रांवर रवाना होतील. हीच प्रक्रिया जळगाव जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात राबविण्यात येणार आहे.

Collector Ayush Prasad
Jalgaon Political News : गुलदस्त्यातील राजकीय भूमिका सुरेशदादा जैनांनी केली जाहीर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com