Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव लोकसभेत पराभवाच्या भितीपोटी भाजपची कटकारस्थाने! संजय सावंत

Political News : जळगाव लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार पाच लाखांनी निवडून येण्याचा दावा करणाऱ्या भाजपला आता पराभवाची भिती वाटू लागली आहे
Jalgaon Lok Sabha Election 2024 Sanjay Sawant
Jalgaon Lok Sabha Election 2024 Sanjay Sawantesakal

Jalgaon Lok Sabha Election 2024 : जळगाव लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार पाच लाखांनी निवडून येण्याचा दावा करणाऱ्या भाजपला आता पराभवाची भिती वाटू लागली आहे. त्यासाठी विरोधी उमेदवार करण पवार यांच्या नामसदृश्‍य उमेदवार उभे करण्याचे कटकारस्थान पक्षातर्फे करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. (Jalgaon Lok Sabha Election 2024 Sanjay Sawant allegation BJP conspiracy)

श्री. सावंत म्हणाले, की सारख्या नावाचा उमेदवार शोधताना भाजपला करणसिंग संजयसिंग पवार नावाचा व्यक्ती सापडला. मात्र, राजकीय दबाव आणून त्याला ‘करण संजय पवार’, असे नाव घोषित करावे लागले. तसेच वंचित आघाडीला उमेदवार सापडत नव्हता. मात्र, ते शोधून २५ एप्रिलला त्यांनी दुपारी पावणेतीनला दोन्ही उमेदवारी अर्ज भरले आहेत.

दोघांची नोटरीही ३८२, ३८३ क्रमांकाने ॲड. शर्मा यांच्याकडून करावी लागली. दोन्ही उमेदवाराचे सूचक भाजपचे कार्यकर्ते आहेत. दोन्ही उमेदवारांच्या भरलेल्या अर्जांवरील हस्ताक्षर चाळीसगाव येथील भाजप आमदाराच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे आहेत. दोन्ही उमेदवार भाजप पुरस्कृत असून, भाजपची ‘बी’ टीम आहे. (Latest Marathi News)

Jalgaon Lok Sabha Election 2024 Sanjay Sawant
Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

शिवसेनेचे मताधिक्य कमी करण्याचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. कारण भाजपने पराभवाचा धसका घेतला आहे. त्यामुळे त्यांना हे उपदव्याप करावे लागत आहेत. आजच्या स्थितीत भाजपचे कार्यकर्तेही त्यांच्या उमेदवाराबरोबर काम करण्यास तयार नाहीत, असा आरोपही त्यांनी केला. माजी महापौर जयश्री महाजन या वेळी उपस्थित होत्या.

Jalgaon Lok Sabha Election 2024 Sanjay Sawant
Nashik Lok Sabha Constituency : नाराजी दूर करण्यासाठी भुजबळांच्या दारी महाजन; बंद दाराआड सव्वा तास चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com