Jalgaon Lok Sabha Election : उमेदवारी अर्ज स्वीकारताना राबविली चारस्तरीय पद्धत!

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्यापासून ते उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत चार स्तरीय पद्धत अवलंबिल्यामुळे शुक्रवारी (ता. २६) छाननी सुलभ झाली.
Four level system implemented while accepting Candidacy nominations
Four level system implemented while accepting Candidacy nominationsesakal

Jalgaon News : जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज घेण्यापासून ते उमेदवारी अर्ज भरण्यापर्यंत चार स्तरीय पद्धत अवलंबिल्यामुळे शुक्रवारी (ता. २६) छाननी सुलभ झाली. उमेदवारांचे योग्य कागदपत्र असल्यामुळे फारसे अर्ज अवैध झाले नाहीत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. (Four level system implemented while accepting nominations)

चार स्तरीय प्रक्रिया

टेबल क्रमांक एकवर नामनिर्देशन पत्र व शपथपत्र फॉर्म नं. २६ वाटप करण्यात आले. अनामत रक्कम स्वीकृती, उमेदवारांचा फोटो, नमुना स्वाक्षरी व संपर्क पत्ता स्वीकृती, उमेदवारांना निवडणूकविषयक सर्व नमुने व साहित्य वाटपाची होती. टेबल क्रमांक दोनवर शपथपत्र फॉर्म नं.२६ व अतिरिक्त कागदपत्र तपासणी (यादीनुसार तपासणे).

बँकेचे पुस्तक तपासणी या सुविधा येथे देण्यात आल्या. टेबल क्रमांक तीनवर नामनिर्देशन पत्र व कागदपत्रे स्कॅनिंग करण्याची सुविधा होती. चौथ्या टेबलवर संगणक कक्ष होता. त्यात सर्व संबंधित माहिती सुविधा प्रणालीत भरणे तसेच अधिकृत संकेतस्थळावर दैनंदिन माहिती भरण्याची सुविधा निर्माण करून देण्यात आली. यामुळे सगळी प्रक्रिया सुलभ झाली. (latest marathi news)

Four level system implemented while accepting Candidacy nominations
Jalgaon Sharad Pawar : ज्येष्ठ नेते शरद पवार शुक्रवारी जळगावला मुक्कामी थांबणार; नाराजांशी चर्चेसह व्यूहरचनेवर भर

जळगावमध्ये फक्त चार उमेदवारांचे अर्ज अवैध झाले, तर रावेरमध्ये दोन उमेदवारांचे अर्ज अवैध झाले. शपथ घेण्यासाठी विशिष्ट डायसपासून ते डिजिटल घड्याळापर्यंत नियोजन केल्यामुळे अवघ्या काही मिनिटाच्या आत नामनिर्देशन प्रक्रिया पूर्ण होत होती. शेवटचे नामनिर्देशन पत्र शेवटचे तीन मिनिट असताना पूर्ण झाले.

सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना ही सर्व प्रक्रिया समजून सांगितली होती. त्यामुळेही ही प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत झाल्याचे रावेर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अंकुश पिनाटे यांनी सांगितले.

Four level system implemented while accepting Candidacy nominations
Jalgaon Lok Sabha Election : अंजनी प्रकल्प, ‘एमआयडीसी’सह प्रत्येकवेळी केवळ आश्वासनेच!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com