Jalgaon Lok Sabha Constituency : जळगाव मतदारसंघात दुरावलेली मने जुळली; करण पवारांना पक्षांतराचा निर्णय लाभदायक

Jalgaon News : जळगाव लोकसभा मतदारसंघातील पारोळा एरंडोल विधानसभा क्षेत्रात करण पवारांना पक्षांतराचा निर्णय लाभदायक ठरल्याचे दिसून आले.
Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Lok Sabha Constituency esakal

पारोळा : जळगाव लोकसभा मतदारसंघातील पारोळा एरंडोल विधानसभा क्षेत्रात करण पवारांना पक्षांतराचा निर्णय लाभदायक ठरल्याचे दिसून आले. उमेदवार म्हणून निवडणूकीला सामोरे जाणाऱ्या करण पवार यांच्या पाठीमागे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे माजी राज्यमंत्री डॉ. सतीश पाटील हे आपोआपच उभे राहिले. त्यांचा पूर्ण परिवार तसेच नातेवाईक मित्रमंडळी हे सर्व घटक करण पवारांच्या सोबत आले. (Jalgaon Lok Sabha Constituency)

या निमित्ताने पवार परिवारात दुरावलेली मने एकत्र आली. हे पारिवारिक चित्र संपूर्ण मतदारसंघासाठी वेगळेच उदाहरण ठरावे. मात्र भाजपाच्या स्मिता वाघ यांच्यासमोर आता माजी मंत्री डॉ. सतीश पाटील यांच्या रूपाने फार मोठे आव्हान उभे ठाकते की काय असे वातावरण मतदारसंघात निर्माण झाले आहे.

राजकीय वर्तुळात पवार या शब्दाला गेल्या सहा दशकापासून एक वेगळे वलय तयार झाले आहे. सर्वसामान्य मतदाराचा विश्वास पवार या नावावर केंद्रित झालेला आहे. असे असताना गेल्या पाच वर्षाच्या कालखंडात एरंडोल पारोळा मतदार संघाच्या दोन पवारांत मतभेद झाले. त्याचे परिवर्तन विळ्या भोपळ्याच्या नात्यात झाले.

मतदारसंघात कै. आमदार भास्करराव पाटील यांनी निर्माण केलेलं राजकीय वलय दोन भागात विभागले गेले. गटागटात राजकारण सुरू झाले.परंतु सांगतात ना वेळ कधीच सांगून येत नाही ती केव्हाही बदलते आणि बदलत असते. अचानक जळगाव लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदारांना डावलण्यात आले. (Latest Marathi News)

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Loksabha: भाजपचा विद्यमान खासदार ठाकरेंकडून लढणार? लोकसभेचं समीकरण बदलणार?

त्यांच्या कामाकडे दुर्लक्ष करण्यात आले. असा समज कार्यकर्त्यांनी करून मतदारसंघात असंतोष निर्माण झाला. त्याचे पर्यावसन चाळीसगावपासून जळगावपर्यंत पडसाद उमटू लागले. आणि आपल्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या भावनांचा विचार करीत विद्यमान खासदार उन्मेश पाटील व त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पारोळ्याचे लोकनियुक्त माजी नगराध्यक्ष करण पवार यांनी शिवबंधन बांधले.

उन्मेश पाटील यांनी दाखवून दिले की, मी तिकिटासाठी पक्ष बदलत नसून माझ्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या मित्र परिवारासाठी निर्णय घेतला. त्यामुळे संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला. भाजपाच्या स्मिता वाघ यांची उमेदवारी जाहीर झाली. त्यांचा प्रचारदेखील सुरू झाला. परंतु भाजपाचे विद्यमान खासदार असताना उन्मेष पाटील व भाजपाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख करण पवार हे पक्ष सोडून गेले.

त्यामुळे भाजपाच्या एकतेला कुठेतरी खिंडार पडले. शिवसेना ठाकरे गटाला या निमित्ताने बळ मिळाले. राजकारणाचे सगळे गणित बदलले. शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार म्हणून करण पवार यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे राष्ट्रवादीचा शरद पवार गट आणि भाजपाचा उन्मेश पाटील यांचा गट एकत्र आला आहे. या लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

Jalgaon Lok Sabha Constituency
Jalgaon Loksabha: स्मिता वाघांच्या विरोधात ठाकरेंनी मैदानात उतरवलेल्या करण पवारांची ताकद किती?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com