Jalgaon Lok Sabha Election : रामदेववाडी ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार; 1304 मतदारांनी नाकारले मतदान

Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघातील रामदेववाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला.
 Lok Sabha Election
Lok Sabha Election esakal

Jalgaon Lok Sabha Election : जळगाव लोकसभा मतदारसंघातील रामदेववाडी गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. दुपारी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांची बैठक घेऊन बहिष्कार मागे घेण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, ते प्रयत्न अयशस्वी ठरले. तेथे सुमारे १,३०४ मतदान होते. जळगाव-पाचोरा रोडवरील रामदेववाडीजवळील पठारवाडी परिसरात मंगळवारी (ता. ७) जळगावकडून भरधाव येणाऱ्या स्पोर्ट्‌स कारच्या धडकेत आशासेविका राणी ऊर्फ वच्छलाबाई सरदार चव्हाण (वय ३०) यांच्यासह मुले सोमेश चव्हाण (वय २), सोहन चव्हाण (वय ७) यांचा मृत्यू झाला होता, तर सोबत असलेला भाचा लक्ष्मण पद्मसिंग नाईक (वय १६) गंभीर जखमी झाला होता. ( Ramdevwadi villagers boycott voting )

रात्री बाराला उपचारादरम्यान लक्ष्मण नाईक याचाही मृत्यू झाला होता. याबाबत मृत वच्छलाबाई चव्हाण यांचे भाऊ राजेश चव्हाण (वय ३०, रा. रामदेववाडी) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात कारचालकाविरुद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल झाला आहे.

कार रेसिंगचा आरोप

जळगाव-पाचोरा रोडवर अपघातग्रस्त इको स्पोर्ट्‌स कारसोबत एक इन्व्होवा आणि आणखी एक एसयुव्ही कार असल्याचे रामदेववाडी ग्रामस्थांचे म्हणणे असून, इन्होवा कार जमावाने फोडल्याचेही सांगितले. अपघातानंतर सावध झालेल्या त्या दोघी गाड्या मागूनच पळून गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. (latest marathi news)

 Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : तापमानाचा पारा घसरला, मतदानाचा टक्का वाढला ! उमेदवारांचे भवितव्य मशिनबंद

‘ते’ सर्व मुंबईला रवाना

कारमध्ये राजकीयदृष्ट्या बलाढ्य व बड्या व्यावसायिकांच्या घराण्यातील तरुणांचा समावेश आहे. त्यात अर्णव अभिषेक कौल, अखिलेश संजय पवार, ध्रुव सोनवणे यांच्यासह दोन अनोळखी व्यक्तींचाही समावेश असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. अपघातानंतर ग्रामस्थांनी कारमधील तरुणांना मारहाण केली. कारमधील तरुणांना उपचाराच्या नावाखाली मुंबईला रवाना केल्याचा आरोप होत आहे.

अटकेच्या मागणीवर ग्रामस्थ ठाम

अपघातानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित झाले आहेत. बड्या घरातील तरुणांच्या चुकीने चौघा निष्पाप व गरीब घरातील लेकरं व त्यांच्या आईचा जीव गेला. त्यामुळे संशयितांना अटक करून त्यांच्यावर कारवाईसाठी रामदेववाडी ग्रामस्थ एकवटले आहेत. त्या मागणीवर ठाम राहून ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचा इशारा दिला होता. मात्र, तो मागे घेण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित प्रयत्न झाले नाहीत. शेवटी ग्रामस्थांनी मतदान केलेच नाही.

 Lok Sabha Election
Jalgaon Lok Sabha Election : मोदी... विकासाचे गुजरात पॅटर्न, विकसित भारत अन्‌ सुरेशदादांची भूमिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com