
चाळीसगाव : येथील बाजार समितीत शेतकऱ्यांचा माल मोजण्याच्या तोलकाट्यावर दोन, पाच नव्हे; तर तब्बल शंभर किलो माल कमी मोजला जात होता. शेतकऱ्याची फसवणूक होत असल्याचे काही सुज्ञ शेतकऱ्यांच्या लक्षात येताच एकच गोंधळ उडाला. चौकशीअंती एका तोलमागे एक क्विंटल माल कमी येत असल्याचे निष्पन्न झाले. अखेर बाजार समितीने ज्या- ज्या शेतकऱ्यांचा माल या काट्यावर मोजलेला होता, त्यांना त्यांचे पैसे देण्याचे मान्य करून या काट्यावरील मापाडीवर निलंबनाची कारवाई केली. (Looting of farmers through tol kata type in Chalisgaon market committee Mandi suspended )