Jalgaon Unseasonal Rain Damage : डोळ्यादेखतचं नुकसान.. हेलावणारं मन अन्‌ अस्वस्थता!

Jalgaon Unseasonal Rain Damage : रात्रीचा दिवस करुन, प्रचंड मेहनतीनं सजवलेलं शिवार, त्यातून निघालेलं पिक.. आता बाजारात विकायचीच वेळ..
Unseasonal Rain Damage (file photo)
Unseasonal Rain Damage (file photo)esakal

Jalgaon Unseasonal Rain Damage : रात्रीचा दिवस करुन, प्रचंड मेहनतीनं सजवलेलं शिवार, त्यातून निघालेलं पिक.. आता बाजारात विकायचीच वेळ.. अशात अचानक मनी ध्यानी कल्पना नसताना आभाळ भरुन यावं अन्‌ पाऊस, गारपिटीचा मारा करुन क्षणांत चार- सहा महिन्यांच्या कष्टावर ‘पाणी’ फिरवावं, यापेक्षा दुसरं दु:ख नाही.

गेल्या चार- पाच दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातल्या बहुतांश शेतकऱ्यांची ही अवस्था.. (Jalgaon Loss of rabi season crops due to unseasonal rain and hail)

हातातोंडाशी आलेला घास हिरावलेला.. हे ‘अवकाळी’ संकट तर सरकार थांबवू शकत नाही; पण, किमान अन्नदात्याला मदतीचा हात तर नक्कीच देऊ शकतं.. ते काम इमानं इतबारे व्हावं, ही अपेक्षा.. गेल्या आठवड्यात चार- पाच दिवसांपासून वातावरण बदलून गेलंय.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची ‘वर्दी’ येत असतानाच सीझन नसताना अगंतुक नको असलेला पाहुणा म्हणून अवकाळी पाऊस गारपीट घेऊन आला आणि शेतकऱ्याच्या कष्टावर, पर्यायाने उत्पादनावर पाणी फिरवून गेला. रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारीसह अन्य पिकांवर त्याने पाण्यासह गारपिटीचा असा काही नांगर फिरवला की, शेतकऱ्यांनं या नुकसानीतून बाहेरच पडू नये.

नाही म्हणायला, हवामान खात्यानं अंदाज वर्तविला होता खरा; पण नजर जाईल तोवर विस्तारलेल्या शिवाराला अवकाळी पावसापासून वाचवणार कसा? हा प्रश्‍न. आणि त्याचे उत्तर कुणाकडेच नाही. गेल्या आठवड्यात जेव्हा अवकाळी पावसाने जिल्ह्याच्या मुख्यत्वे पश्‍चिम भागात हजेरी लावली तेव्हा, आमचे धरणगाव तालुक्यातील भोणे गावचे मित्र व अभ्यासू शेतकरी चिंतामण पाटील यांचा फोन रात्री दहाच्या सुमारास आला..

‘कापऱ्या आवाजात त्यांनी शेतात हरभरा कापून तयार आहे अन्‌ तासाभरापासून पाऊस सुरु आहे..’ अशी माहिती दिली.. या विषयात मी काही करु शकत नाही, हे त्याना पुरते माहीत. पण, पत्रकार मित्राला माहिती देण्याचे कर्तव्य त्यांनी पार पाडले. जिल्हाभरातील स्थितीचा आढावाही त्यांनी जाणून घेतला.. त्या रात्री त्यांचा हरभरा डोळ्यादेखत वाया जात होता.

Unseasonal Rain Damage (file photo)
Jalgaon News : वारकरी भवनाचे' मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन : पालकमंत्री पाटील

ते शेतात जाऊन त्याला वाचवूही शकत नव्हते.. ‘पावसानं हरभऱ्यासह अन्य पिकांची नासधूस करणारी ती रात्री त्यांच्यासाठी प्रचंड अस्वस्थ करणारी असेल..’ या कल्पनेनं प्रत्येक संवेदनशील मनाची तशीच अवस्था होणं स्वाभाविकच. त्यांच्या हातात आलेलं हरभऱ्याचं पिक अवकाळीनं हिरावून नेलं..

तीन महिन्यांपासून घेतलेली मेहनत पाण्यात गेली.. उत्पन्न तर दूरच, लावलेला पैसाही वाया गेला.. कमी- अधिक प्रमाणात सर्वच ठिकाणची ही स्थिती. तिकडे धुळे, नाशिक जिल्ह्यात, मराठवाड्यातही पाऊस झाला. नाशकात पेटीत भरण्याच्या स्थितीत असलेल्या द्राक्षांच्या बागांचे नुकसान झाले. तिथला शेतकरीही हळहळला..

खरेतर, गेला पावसाळा अपुऱ्या पावसाचा होता. टंचाईच्या झळा त्यावेळपासूनच जाणवतांय. खरिपाचे अपेक्षित उत्पन्न हाती आले नव्हते. प्रकल्पांमध्ये पाणीसाठा अपुरा. त्यामुळे रब्बीला पुरेसे पाणी मिळणार नाही, हे अपेक्षितच होते. त्यातच, अवकाळी पावसानं, गारपिटीनं तीन- चार दिवसांपासून जो कहर केला आहे, तो शेतकऱ्याच्या जखमांवर मीठ चोळणारा.

डोळ्यादेखत शेतकऱ्याचं नुकसान झालंय. ते तर भरुन निघू शकत नाही. नुकसानीचे पंचनामे, त्याचे अहवाल ही औपचारिकता पार पडेल. नुकसान भरपाई, मदतीच्या रकमा कशा, किती स्वरुपात मिळतील? हा प्रश्‍नच आहे. पण, अशा भरपाईतून शेतकरी तरेल, याची शक्यता नाही. त्याच्या नशिबी तेच ते नुकसान, तोच कर्जबाजारीपणा, तीच अस्वस्थता..

Unseasonal Rain Damage (file photo)
CM Shinde Jalgaon Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जळगाव जिल्ह्यात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com