Fast Bowler Search Mission: 'शोध महा वेगाचा’, महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांसाठी सुवर्णसंधी! येथे करा नोंदणी

Jalgaon News : महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार : शोध महा वेगाचा’ ही शोध मोहीम हाती घेतली आहे.
Fast Bowling
Fast Bowlingesakal

जळगाव : जर तुम्ही वेगवान गोलंदाज आहात, तर ही सुवर्णसंधी तुम्ही दवडू नका. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेने महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांचा शोध घेण्यासाठी ‘महा स्पीडस्टार : शोध महा वेगाचा’ ही शोध मोहीम (Fast Bowler Search Mission) हाती घेतली आहे. (jalgaon maha speedstar fast bowlers Search Mission marathi news)

९ ते ३१ मार्च दरम्यान राज्यातील पाच ठिकाणी होणाऱ्या या शोध मोहिमेत सहभाग घेऊन कौशल्य दाखविण्याची संधी आहे. मोहिमेची अधिकृत घोषणा झाल्यापासून राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. आजपर्यंत हजारो खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

स्पर्धेसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अधिकृत वेबसाईटवर (www.cricketmaharashtra.com) जाऊन नोंदणी करणे आवश्यक असून समिती नियुक्त करण्यात आली आहे. समद फल्लाह, चारुदत्त कुलकर्णी, शिरीष कामठे, अनुपम संकलेचा, आदित्य डोळे, राजेश माहूरकर, प्रसाद कानडे, सुयश बुरकुल, अविनाश आवारे, मनीषा लांडे व कीर्ती धनवान यांचा समावेश आहे.

विनामूल्य असलेल्या या स्पर्धेत अधिकाधिक खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले आहे. जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंनीही जास्तीत जास्त सहभाग नोंदवून आपले कौशल्य दाखवावे असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनेचे अॅपेक्स कौन्सिल सदस्य अतुल जैन, सचिव अरविंद देशपांडे यांनी केले आहे. (Latest Marathi News)

Fast Bowling
Ind vs Eng 5th Test Day 2 Live : लंचनंतर भारताला पाठोपाठ दोन धक्के; शतकवीर गिल अन् रोहित बाद

अशी होईल निवड

या उपक्रमात पुरुष व महिला वरिष्ठ व कनिष्ठ गटातील खेळाडू सहभागी होऊ शकतात. विजेत्यांना आकर्षक पारितोषिके मिळणार आहेत. खेळाडूंना महाराष्ट्र प्रीमियर लीग आणि महिलांची महाराष्ट्र प्रीमियर लीगच्या लिलावात यायची संधी मिळेल. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व गुणी गोलंदाजांवर प्रशिक्षक विशेष लक्ष ठेवून असतील.

त्या गुणी खेळाडूंसाठी आगामी काळात महाराष्ट्र क्रिकेट संघटनेतर्फे वर्षभर विशेष प्रशिक्षण शिबिर विनामूल्य राबवले जाईल. त्यामुळे ही केवळ शोध मोहीम नसून भविष्यात क्रिकेट विश्वाला दर्जेदार, सर्वात वेगवान गोलंदाज मिळावेत, यासाठीची एक चळवळ आहे.

असे आहे स्पर्धेचे वेळापत्रक

९ व १० मार्चला : नाशिक - गोल्फ क्लब ग्राउंड व छत्रपती संभाजीनगर - एडीसीए क्रिकेट ग्राउंड तसेच १६ व १७ मार्चला : नांदेड- नांदेड स्टेडियम, सोलापूर- इंदिरा गांधी स्टेडियम

२३ व २४ मार्चला : पुणे- गहुंजे स्टेडियम यातून महाअंतिम फेरी ही पुण्याच्या गहुंजे स्टेडियम येथे ३१ मार्चला होईल.

Fast Bowling
Rohit Sharma IND vs ENG : कॅप्टन असावा तर असा! शतक ठोकत द्रविडशी केली बरोबरी... मात्र मान दिला गिलला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com