Jalgaon News : प्रतिकूल स्थितीतील दमदार विजयाने महाजनांची वाढली पत; ‘संकटमोचका’चे नियोजन

Jalgaon : सरकारविरोधी वातावरण, शेतकऱ्यांचे प्रश्‍न व मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे राज्यात भाजप- महायुतीला बहुतांश जागांवर फटका बसला.
Girish Mahajan News
Girish Mahajan Newsesakal

Jalgaon News : सरकारविरोधी वातावरण, शेतकऱ्यांचे प्रश्‍न व मराठा आरक्षणाच्या मुद्यामुळे राज्यात भाजप- महायुतीला बहुतांश जागांवर फटका बसला. उत्तर महाराष्ट्रातील आठपैकी अवघ्या दोनच आणि त्याही जळगाव जिल्ह्यातील जागा आल्यामुळे राज्यात मंत्री गिरीश महाजनांची पत वाढलीय. भाजपने जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागांसाठी उमेदवार निवडणूक प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच जाहीर केले होते. (Mahajan credit was boosted by strong victory against adverse conditions)

त्यामुळे उमेदवारांना प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळून दोन्हीही जागा सहज निवडून येतील, असे मानले जात होते. निवडणुकीच्या सुरवातीच्या टप्प्यात वातावरणही तसेच होते. मात्र, निवडणूक व प्रचार जसा पुढे सरकत गेला तशा नवीन समस्या व आव्हाने भाजपसमोर उभी राहू लागली.

महाजनांनी मारली बाजी

खरेतर महाजनांवर जळगावशिवायही राज्यातील अन्य भागांत जाऊन प्रचाराची यंत्रणा सक्रिय करण्यासंदर्भात महत्त्वाची जबाबदारी होती. केवळ भाजपच नव्हे, तर मित्रपक्षांच्या जागांवरही त्यांना नियोजन करायचे होते. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात पुरेसा वेळ देता आला नाही. तरीही आव्हाने आणि समस्यांवर कशाप्रकारे तोडगा काढायचा, याची पूर्ण माहिती असलेल्या गिरीश महाजनांनी सूत्रे हाती घेतली आणि संघटनेचला ‘चार्ज’ करत, काही ठिकाणी स्वत:ची व्यक्तिगत यंत्रणा राबवत त्यांनी अगदी काही दिवसांत जिल्ह्यातील चित्रच पालटून टाकले.

वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसह बूथपातळीपर्यंतच्या रचनेसंदर्भात सूचना देऊन त्यांनी सूक्ष्म नियोजन केले. त्याचे नियंत्रण स्वत:कडे ठेवले आणि दोन्ही ठिकाणी अडीच लाखांहून अधिक मताधिक्याने भाजप उमेदवार विजयी झाल्या.

शेवटच्या दोन दिवसांत...

दोन महिने पूर्णपणे राज्यातील अन्य भागांची जबाबदारी असताना, श्री. महाजन जळगाव जिल्ह्यात प्रचाराच्या अंतिम टप्प्यात म्हणजे मतदानाच्या दोन दिवस आधीच दाखल झाले. या दोनच दिवसांत त्यांनी पक्षाच्या संघटनेसह स्वत:च्या यंत्रणेतील काही खास लोकांना हेरून त्यांना वेगवेगळी जबाबदारी दिली. डॉ. राधेश्‍याम चौधरी, अरविंद देशमुख यांच्यासारख्या शिलेदारांनी जळगावची जबाबदारी निर्विघ्न पार पाडली आणि महाजनांनी पुन्हा त्यांच्या नावापुढील ‘संकटमोचक’ बिरुद अधोरेखित करून दाखवले. म्हणूनच की काय, देवेंद्र फडणवीसांनी सरकारमधून मुक्त होण्याची भावना व्यक्त केल्यानंतर त्या पदासाठी पहिले नाव चर्चेत आले ते महाजनांचे.

Girish Mahajan News
Jalgaon News : पाडळसरे प्रकल्पावर यंदा 136 कोटी खर्च; 13 वॉक वे ब्रीज बसविले

असे प्रश्न, अशा समस्या

-जातीय व धार्मिक ध्रुवीकरणाने चिंता

-शेतकऱ्यांमधील नाराजीचा प्रश्‍न

-ग्रामीण भागातील जनतेत सरकारविरोधी रोष

-पदाधिकारी- संघटनेत समन्वयाचा अभाव

या प्रश्‍नांवर असा काढला तोडगा

-नाराजांना प्रचारात सहभागी करून घेतले

-कार्यकर्त्यांना थेट शेतकऱ्यांशी संवादाच्या सूचना

-पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाची भूमिका निभावली

-कार्यकर्त्यांना चार्ज करून बूथपातळीपर्यंतचे नियोजन

Girish Mahajan News
Jalgaon News: निंभोऱ्यातून केळी वॅगन्सला ‘ग्रीन सिग्नल’! अखेर 12 वर्षांनंतर रेक दिल्लीकडे रवाना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com