लॉकडाऊन मोडून हॉटेल सुरु :  नऊ संशयीतांच्या विरुद्ध गुन्हे दाखल 

Break the lockdown and start the hotel in jalgaon
Break the lockdown and start the hotel in jalgaon
Updated on: 

जळगाव, :- कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी देशात, राज्यात आणि जिल्ह्यातही लॉकडाऊन करण्यात आलेले आहे. लॉकडाऊनचे चार चरण पूर्ण होऊन पाचवे चरणात आजपासून सुरवात झाली.किराणा दुकान व मेडिकल वगळता अन्य आस्थापने बंद आहेत. असे असताना रविवारी रात्री दहा वाजता काही हॉटेल सुरू असल्याचा प्रकार जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे, पोलिस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांच्या पाहणीतून उघडकीस आला आहे. याची दखल घेत नऊ संशयितांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अजिंठा चौफुली जवळील हॉटेल मुरली मनोहर, नेरी नाक्‍याजवळील नारखेडे हॉटेल, कालिका माता चौकातील श्री. गुरू रामदाणी फॅमिली रेस्टॉरंट इत्यादी त्यांच्या पाहणीत सुरू असल्याचे दिसून आले. पोलिस अधीक्षक डॉ. उगले यांनी तत्काळ एमआयडीसी पोलिस ठाण्यात फोन करून कारवाईचे आदेश दिले. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, आनंदसिंग पाटील, पोलिस नाईक दीपक चौधरी, पोलिस कॉंन्स्टेबल इम्रान सय्यद, पोलिस कॉंन्स्टेबल हेमंत पाटील यांच्या पथकाने घटनास्थळ गाठून हॉटेल व्यवसायीकांसह एकूण नऊ संशयितांच्या विरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. 

या हॉटेलचालकांवर गुन्हे 
हॉटेल मुरली मनोहर चे व्यवस्थापक लक्ष्मीनारायण चिरंजीवलाल उपाध्याय रा. गणपतीनगर, हॉटेल कारागीर सुभाष पंडितराव महाजन, दयाकिसन पुरुषोत्तम भाट, मोहन भगवान सोनवणे, सोनुकुमार दिपासींग , प्रेम वल्लभ जोशी सर्व रा.मुरली मनोहर हॉटेल , हॉटेल नारखेडे चा व्यवस्थापक नीलेश प्रकाश भावसार रा. कासमवाडी, सुनील भागवत मराठे तसेच श्री. गुरू रामदाणी फॅमिली रेस्टॉरंट व्यवस्थापक जसप्रीत सिंग कवलसिग सहानी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार अतुल वंजारी हे करीत आहेत. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Nandurbar bribery case
Jalgaon Engineer Incident
Jalgaon Mother and Son Case
Girna Dam Water Storage
Marathi News Esakal
www.esakal.com