नवरी नटली..अन्‌ खाकी नडली ; मग काय? वाचा ! 

सकाळ वृत्तसेवा
सकाळ वृत्तसेवा
Updated on

जळगाव :- रायसोनी नगरातील तरुणीचा नात्यातीलच मुला सोबत विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता. नवरीने साज चढविला..नटून थटून ती मांडवात येणार, नवरदेवही तयार झाला "टाळी' लागणार इतक्‍यात..पोलिस धडकले. नवरदेव नवरीसह वऱ्हाडींना पोलिस ठाण्यात यावे लागले. अठरा वर्षाला अवघे काही दिवस कमी असल्याने नवरी अल्पवयीन ठरली. पोलिसांनी कायदा समजून सांगितल्यावर मात्र, दोन्हीकडील मंडळींनी साखरपुडा करून लग्न काही दिवसांनी करण्याची शाश्‍वतीदेत तशी लेखी हमी पोलिसांना दिल्यावर समज देऊन दोन्हीकडील मंडळीची सुटका झाली. 

काही वर्षापूर्वीच पूजा पवार(काल्पनिक नाव) हिचे मातृछत्र हरपले. वडील मोलमजुरी करणारे, कुटुंबात मुलीचा सांभाळ करणारं कोणी नाही, म्हणून मुलीच्या आत्याने तिची जबाबदारी सर्व जबाबदारी घेतली. अशात मुलीचे वडील मनोरुग्ण झाल्याने आणि मुलगी मोठी झाली...म्हणून अत्याने तिला सून म्हणून करून घेण्याचा निर्णय घेतला, खासगी कंपनीत कामाला असलेला मुलगाही मामाच्या मुली सोबत लग्न करण्यास तयार झाला. लॉकडाऊनचा काळ असल्याने विवाह, समारंभांना परवानगी नाही, म्हणून मोजक्‍या नातेवाइकांच्या उपस्थितीत लग्नाचा बेत आखण्यात आला. गुरुवार (ता.24) रोजी दोन्हीकडील "पै-पाहुणे' एकवटून वधू-वर मांडवात येऊन त्यांच्यावर अक्षदा पडणार इतक्‍यात रामानंदनगर पोलिस ठाण्याचे वाहन पोलिसांसह धडकले. नवरदेव, नवरी, वर माय यांच्यासह वऱ्हाडी नातेवाइकांना पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वधू 18 वर्षे पूर्ण असल्याचा समज झालेल्या वरपक्षाला मुलीच्या जन्म तारखेचा दाखला मागितल्यावर..नातेवाइकांची धावपळ सुरू झाली. शाळेचा दाखला, आधारकार्ड..असे सर्व शोधा-शोध होऊन अखेर शाळेचा दाखला भेटलाच त्यात मुलीला अठरा वर्षे पूर्ण होण्यास काही दिवस बाकी होते..परिणामी लग्नाच्या तयारीत असलेल्या पाहुण्यांनी लग्न ऐवजी साखरपुडा करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांना तसा जबाब ही लिहून दिला. पोलिसांनी ताकीद देत दोघा कुटुंबीयांची सुटका केली. 

फोन करणारा..कोण? 
घरात मनोरुग्ण वडील..आई वारलेली...तारुण्यात येणाऱ्या एकट्या मुलीचे बरेवाईट होऊ नये..म्हणून आत्यानेच पुढाकार घेत तिला सून करुण घेण्याचा निर्णय घेतला. घरातल्या घरात होणाऱ्या सोहळ्याची नेमकी माहिती "चाईल्ड लाईन' वाल्यांना कुणी व का, दिली. याचा संताप दोन्हीकडील मंडळी पोलिस ठाण्यात करीत होते. 
 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com