कोरोना संसर्ग आटोक्यात; बाधितांचा चाळीसगावात दुहेरी आकडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon corona update

कोरोना संसर्ग आटोक्यात; बाधितांचा चाळीसगावात दुहेरी आकडा

जळगाव : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आटोक्यात (Jalgaon corona update) येत असल्याची चिन्हे आहेत. सोमवारी (ता. १४) चाळीसगाव वगळता जळगाव शहरासह अन्य सर्व तालुक्यांत नव्या बाधितांची संख्या दहाच्या आत होती. दिवसभरात ७२ नवे रुग्ण आढळून आले, तर १६३ बरे झाले. (jalgaon-marathi-news-coronavirus-update-control-positivity-rate-in-district)

जळगाव जिल्ह्यात मे महिन्याप्रमाणेच जून महिन्यातही नव्या बाधितांपेक्षा दररोज बरे होणाऱ्यांचा आकडा अधिक असल्याचा ट्रेंड कायम आहे. सोमवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात नव्याने ७२ रुग्ण समोर आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या एक लाख ४१ हजार ५९४ झाली आहे, तर १६३ रुग्ण बरे झाले. बरे होणाऱ्यांचा आकडा एक लाख ३७ हजार २०२ वर पोचला आहे. गेल्या २४ तासांत केवळ एका रुग्णाचा मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या कमी होत असताना, आता दररोजच्या चाचण्याही घटल्या आहेत. सोमवारी केवळ तीन हजार ४०० वर चाचण्यांचे अहवाल प्राप्त झालेत.

..असे आढळले रुग्ण

जळगाव शहर- तीन, जळगाव ग्रामीण- चार, भुसावळ- पाच, अमळनेर- तीन, चोपडा- चार, पाचोरा- सहा, धरणगाव- सहा, यावल- पाच, एरंडोल- दोन, जामनेर- आठ, रावेर- सहा, पारोळा- सहा, चाळीसगाव- ११, मुकताईनगर व बोदवड प्रत्येकी एक.

लसीकरणही सुरळीत

रविवारी (ता. १३) जिल्ह्यात लशींचा साठा प्राप्त झाल्यानंतर सोमवारी विविध केंद्रांवर लसीकरण सुरळीत झाले. दिवसभरात सहा हजार ९५ जणांना लशीचा पहिला डोस, तर एक हजार १६१ जणांना दुसरा डोस देण्यात आला. जिल्ह्यातील केंद्रांवर अद्यापही कोव्हिशील्डचे ११ हजार ७९२, तर कोव्हॅक्सिनचे दोन हजार डोस शिल्लक आहेत.

टॅग्स :CoronavirusJalgaon