जळगावच्या अठरा शेतकऱ्यांना तीन व्यापाऱ्यांनी गंडवले; ३५ लाखांचा कापूस घेऊन ठोकली धूम

जळगावच्या अठरा शेतकऱ्यांना तीन व्यापाऱ्यांनी गंडवले
जळगावच्या अठरा शेतकऱ्यांना तीन व्यापाऱ्यांनी गंडवले


जळगाव,-  धानवड(ता.जळगाव) येथील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना गाठून क्विंटल मागे जास्तीचा दर आणि पंधराच दिवसात रेाख पेमेंट करून देण्याचे आमिष दाखवत गावातील वीस शेतकऱ्यांचा कापूस ट्रक मध्ये भरून तिन्ही भामटे पसार झाल्याची घटना घडली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे समोर येताच आज या प्रकरणी एमआयडीसी पालीस ठाण्यात तिघा भामट्यांच्या विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी संशयितांचा शोध सुरू केला आहे. 

जळगाव तालुक्यातील धानवड परिसरात गेल्यावर्षी झालेल्या कापसाचा साठा शेतकऱ्यांनी करून ठेवला होता. येाग्य दर आणि रोखीने पैसा मिळाल्यास दिवाळी दरम्यान हा कापूस शेतकरी विकतात. मात्र, यंदाच्या कोरोना संकटामुळे आणि खरिपाच्या पेरण्या आणि शेती कामासाठी पैशांची गरज  पाहून कापूस व्यापारी असल्याचे सांगत तीन तरुणांनी धानवड मध्ये कापूस खरेदीचा प्रचार सुरू केला. ज्यादा दर आणि पंधराच दिवसात हातात रेाख रक्कम मिळणार या अपेक्षेने शेतकऱ्यांनी कापूस विक्रीला काढला.  अमोल भगवान व्यास, गोलू तिवारी आणि प्रदीप अशा तिघांनी धानवड शिवारातील एकामागून एक अशा 18 शेतकऱ्यांकडून प्रत्येकी ४ हजार ७०० रुपये दराने कापूस खरेदी केला.  गावातच कापसाची मोजणी होऊन ट्रक क्र. (एमएच.१९.सी.वाय.७१७) या वाहनात कापूस वाहून नेला. कापूस घेऊन गेल्यानंतर ठरल्या प्रमाणे शेतकऱ्यांनी पैशांची मागणी केल्यावर तिन्ही भामट्यांनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्यावर वाल्मीक एकनाथ पाटील यांनी एमआयडसी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून तिघा भामट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहाय्यक निरीक्षक दिलीप हजारे तपास करीत आहेत. 

या शेतकऱ्यांना गंडवले
वाल्मीक एकनाथ पाटील,५० क्विंटल १३ किलो २ लाख ३५ हजार ६००),  पंढरीनाथ बाबूराव पाटील,८४ क्विंटल ४० किलो (३ लाख९६ हजार ६८०), कैलास आत्माराम पाटील, ११० क्विंटल (५ लाख १७ हजार), बाबूराव तुळशीराम पाटील, ६१ क्वींटल (२लाख ८६ हजार ७००),पंडित मधुकर पाटील ९७ क्विंटल ८५ किलो ४ लाख ६० हजार), रंगनाथ यशवंत पाटील २१ क्विंटल (९८ हजार ७००), समाधान भावराव पाटील ५२ क्विंटल ८० किलो २ लाख ४८ हजार १६०) शांताराम एकनाथ पाटील, ३७ क्विंटल ५० किलोा (१ लाख ७६ हजार २५०), राजेंद्र शिवराम पाटील,५३ क्विंटलर ४५ किलो २ लाख ५१ हजार २१५),  बापु सदाशिव भावसार १२ क्विंटल ७७ किलो ६० हजार ११९), प्रभुदास बाबुराव पाटील ८६ क्विंटल ६० किलो (४ लाख ७ हजार २०), नामदेव गोविंदा पाटिील ३९ क्विंटल ५७ किलो (१ लाख ८५हजार९८९) अशोक शेनफडू पाटील १०० क्विंटल ८० किलो (४ लाख ७३ हजार ७०७),राजाराम लक्ष्मण आवारे २० क्विंटल ४५ किलो (९६ हजार ११५), अर्जुन लक्ष्मण अवारे ६४ क्विंटल ८० किलो (३ लाख४५ हजार ६०),सखाराम लक्ष्मण आवारे ९ क्विंटल (४२ हजार ३००), बंडू गेाबा पाटील २१ क्विंटल(१ लाख १हजार ९९०), नाना माधव पाटील ६ क्विंटल (२८ हजार २०० ), चंद्रकांत नामदेव आवारे २७ क्विंटल २८ किलो १ लाख ७ ५ हजार २१६)


एकुण फसवणुक ३५ लाख ११ हजार २८९ रुपये 

संपादन - रईस शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com