
जळगाव, :- भाच्यांना लस्सी पाजून आणतो, असे सांगत 8 वर्षीय बालिकेसह तिच्या भावंडांना रिक्षात बसवून मामाच्या मित्र समाधान बडगुजरने नेले होते.भावंडांना परत सोडून 8 वर्षीय बालिकेवर अत्याचार करून तिची निघृण हत्या करत मृतदेह विहिरीत फेकल्याची घटना चार वर्षापूर्वी (14 मे 2016 रोजी) जळगाव शहरात घडली होती. जिल्हा न्यायालयात दाखल खटल्यात मंगळवारी न्यायालयाने समाधान लोटन बडगुजर (वय-30 रा. पिंपळकोठा) यास दोषी ठरवून जन्मठेप तसेच अन्य कलमात पाच वर्षाचा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तसेच दंडाची 25 हजाराची रक्कम पिडीतेच्या आईला देण्याचे आदेश न्या. पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयाने दिले.
काय घडले होते प्रकरण
एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीत विधवा महिला तिच्या भावाकडे वास्तव्यास होती. समाधान बडगुजर हा महिलेच्या भावाचा मित्र असल्याने त्याचे घरी येणे-जाणे होते. घटनेच्या दिवशी (ता.14 मे 2016) तो, नेहमी प्रमाणे घरी आला, पिडीतेसह तिच्या भावंडांना लस्सी पाजून आणतो असे सांगत त्याने शहरात आणले, थोड्या वेळाने दोघा भावंडांना परत सोडून आठ वर्षीय बालिकेला सोबत घेऊन निघून गेला होता. संध्याकाळी तिची आई कामावरून परतल्यानंतर "समाधान मामा' सोबत ताई गेल्याचे चिमुरड्यांनी आईला सांगितले. मात्र, मुलगी मिळूनच येत नसल्याने रात्री उशिरा एमआयडीसी पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
बलात्कारानंतर मृतदेह फेकला विहिरीत
पिडीतेच्या अपहरणानंतर 4 दिवसांनी (ता.18 मे ) पिंप्राळा शिवारात अनिल भीमसिंग पाटील (वय-43) यांच्या शेतातील विहिरीत अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळ गाठत मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. एमआयडीसी पोलिसांत बालिका अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याने तिच्या आईला पोलिसांनी पाचारण केले. पीडितेची आई घटनास्थळावर दाखल होताच तिने हंबरडा फोडतच ओळख पटविली. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आल्यावर पिडीतेवर अत्याचार करून तिचा गळा दाबत हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते. तद्नंतर एमआयडीसी पोलिसांत दाखल गुन्ह्यात खून आणि बालकांचे लैंगिक अत्याचारा पासून संरक्षण अधिनियम-2012 अन्वये कलमांचा समावेश करण्यात आला.
23 साक्षीदारांनी नोंदवला जबाब
सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागूल यांनी तपासाअंती दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. न्या.पी. वाय. लाडेकर यांच्या न्यायालयात खटल्याचे कामकाज होऊन सरकारपक्षाने अपहरणाच्या गुन्ह्याचे प्रत्यक्षदर्शी, तपासाधिकारी, वैद्यकीय अधिकारी अशा 23 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. बचावासाठी आरोपी समाधान यानेही खटल्यात शपथेवर साक्ष दिली. खुनाच्या घटनेचा प्रत्यक्षसाक्षीदार नसताना परिस्थितीजन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांच्या साक्ष यांच्या आधारे संशयीता विरुद्ध गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षेची सुनावणी केली.
असे कलम, अशी शिक्षा
समाधान बडगुजर याच्या विरुद्ध गुन्हा शाबीत झाल्याने न्या.लाडेकर यांच्या न्यायालयाने संशयितास कलम- 302(खून) मध्ये जन्मठेप तसेच वीस हजार दंड , कलम-363 (अपहरण)नुसार पाच वर्षे सश्रम कारावास पाच हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दोन महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. तसेच दंडाच्या रक्कमेतून 25 हजार रुपये पीडितेच्या आईला देण्याचे आदेशही न्या न्यायालयाने दिले. सरकार पक्षातर्फे ऍड. शीला गोडांबे यांनी कामकाज पाहिले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.