..तो, आय लव्ह यु म्हणाला अन्‌ हिने घेतले विष 

..तो, आय लव्ह यु म्हणाला अन्‌ हिने घेतले विष 
..तो, आय लव्ह यु म्हणाला अन्‌ हिने घेतले विष 

जळगाव :- शहरातील मेहरुण रामेश्‍वर कॉलनीतील रहिवासी 17 वर्षीय बालिकेच्या घरात शिरून तिला परिसरातीलच एका तरुणाने "आय लव्ह यू..' म्हटल्याने भेदरुन गेलेल्या यातरुणीने बदनामीच्या भीतीने विषप्राशन केल्याची घटना आज सकाळी सात वाजता घडली. पोलिसांनी संशयित तरुणाला ताब्यात घेतले असून पीडित बालिकेवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

रामेश्‍वर कॉलनी मेहरुण येथील 17 वर्षीय पिंकी (काल्पनिक नाव) सकाळी झोपेतून उठली..घरात आई पुढच्या खोलीत असल्याने ती, मागील गॅलरीत असताना गल्लीतील एक भामटा तरुण तिच्या घरात शिरला होता. ओळखीचा असल्याने तिला काहीच कळाले नाही, तू आमच्या घरात आला कशासाठी याची चौकशी करण्यासोबतच त्याने बोलायला सुरवात केली. माझं..तुझ्यावर प्रेम आहे..आय लव्ह यु असे म्हणत त्याने तिचा हात धरल्याने ती ओशाळली. तरुण तिच्या घरात शिरल्याचे कोणीतरी बघितले असावे, आपली व कुटुंबाची बदनामी होईल या भीतीने घाबरलेली असतांनाच पिडीतेची आई समोर आली, त्याने त्या मुलास हटकल्याने त्याने झटापटी करून धमावल्याने मुलीने घरात जाऊन विष(टाईल्स्‌ क्‍लिनर) प्राशन केले. बेशुद्धावस्थेत मुलगी मिळून आल्याने आईने तत्काळ शेजाऱ्यांच्या मदतीने रुग्णालयात उपचारार्थ हलवले.पिडीतेच्या आईच्या तक्रारीवरून संध्याकाळी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी संशयित सचिन रामदास पवार (रा.अयोध्यानगर) ला ताब्यात घेतले असून त्याच्या विरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम-2012 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप पाटील करीत आहेत. 

बदनामीची धमकी.. 
मुलीच्या आईने सचिनला दरडावून घराचे दार बंद केल्यावर, त्याने दाराला लाथा मारल्याने मुलीच्या आईच्या कपाळाला मार लागला. दार उघडले नाही तर, मी तुमच्या मुलीसोबतचे फोटो व्हॉटस्‌ ऍपवर टाकून बदनामीची धमकी दिली आहे. 

पळून जातांना संशयित अटकेत 
मुलीने विष प्राशन केल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला, तिला रुग्णालयात दाखल केल्याची माहिती होताच सचिन रामदास पवार याने पळ काढला. पोलिस निरीक्षक विनायक लोकरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक संदीप पाटील, सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, अतुल वंजारी, रामकृष्ण पाटील, इम्रान सय्यद, अशांनी पाठलाग करून संशयिताला ताब्यात घेतले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com