पेग रिचवून ती..लांबवायची वाहन..तो  पाळतीवर ; २५ दुचाकीसह अमळनेरचे बंटी-बबली अटकेत 

छोटू ऊर्फ निवृत्ती सुकलाल माळी हा अमळनेर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. तहसील कचेरी, पेालीस ठाणे, न्यायालयातील अर्जफाटे आणि तक्रारींसाठी तो, ग्रामस्थाना मदत करीत असल्याने त्याची बऱ्यापैकी ओळखी होती. साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर
छोटू ऊर्फ निवृत्ती सुकलाल माळी हा अमळनेर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. तहसील कचेरी, पेालीस ठाणे, न्यायालयातील अर्जफाटे आणि तक्रारींसाठी तो, ग्रामस्थाना मदत करीत असल्याने त्याची बऱ्यापैकी ओळखी होती. साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर
Updated on

जळगाव, ः- दारूचे देान..तीन..पेग चढवल्यावर ती, मास्टर की वापरून पार्किंग मध्ये उभ्या दुचाकी लीलया लांबवायची आणि तो, पाळत ठेऊन असायचा. अमळनेरच्या महिला चोरसह तिच्या मित्राला गुन्हेशाखेच्या पथकाने अटक केली आहे. या बंटी और बबली च्या जोडीने गेल्या चार वर्षात अनेक दुचाकी चोरुन त्यांची कवडीमोल भावात विक्री केल्याचे उघडकीस आले असून पोलिसांनी २५ मोटारसायकली या जोडीकडून जप्त केल्या असून इतरही वाहने मिळण्याची शक्यता पेालिसांनी वर्तवली आहे. 

गेल्या पाच वर्षापुर्वी गाजलेल्या हिंदी सिनेमा बंटी और बबली प्रमाणे, चोरीच आपला उदनिर्वाहचा धंदा अवलंबलेल्या जोडप्यासह त्याच्या साथीदारास गुन्हेशाखेने अटक केली आहे. घटस्फोटित हेमलता देविदास पाटील (वय-३५,रा.खड्डाजीन अमळनेर) व निवृत्ती सुकलाला माळी ऊर्फ छोटू (वय-४८,रा.माळीवाडा अमळनेर) या दोघांची भेट सहा वर्षापूर्वी न्यायालय आवारात झाली. समलिंगी प्रकरणात ती, न्यायालयात आली होती, तेव्हा छोटू स्टॅम्प वेंडरकडे मदतीनीस म्हणून कार्यरत होता. देाघांची ओळख झाली ओळख वाढत जाऊन त्याचे प्रेमात रूपांतर होऊन दोघांनी हौसे खातर चोरीचा धंदा अवलंबला. शासकीय कार्यालये, मार्केट मधे उभ्या दुचाकी लांबवायच्या आणि नंतर स्टॅप्म पेपरवर लेखी करुन त्या दहा बारा हजारात विक्री करायचा व्यवसाय धरणगाव-अमळनेर या देान्ही तालुक्यात तेजीत सुरू असतांनाच गुन्हेशाखेच्या पथकाला सुगावा लागला. निरीक्षक बापू रेाहोम यांच्या पथकातील संजय सपकाळे, अशरफ शेख, सुधाकर अंभोरे अशांनी सलग तीन दिवस पाळत ठेवून चेारीची दुचाकी विक्री करताना बंटी-बबलीच्या जोडीला रंगेहाथ अटक केली. पथकातील नरेंद्र वारुळे, विजय पाटील, किरण चौधरी अशांनी एका मागून एक २५ दुचाकी जप्त केल्या आहेत.  

गाड्या घेणारेही आरेापी..
छोटू ऊर्फ निवृत्ती सुकलाल माळी हा अमळनेर तालुक्यात सामाजिक कार्यकर्ता म्हणून परिचित आहे. तहसील कचेरी, पेालीस ठाणे, न्यायालयातील अर्जफाटे आणि तक्रारींसाठी तो, ग्रामस्थाना मदत करीत असल्याने त्याची बऱ्यापैकी ओळखी होती. साध्या शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपर वर गाडीनंबरसह तो हमीपत्र लिहून देत सत्तर हजारांचे वाहन १० ते १५ हजारांना विकून निश्‍चीत होत असे. जुनी दुचाकी कमी किमतीत मिळून देणारा असल्याने त्याचा बऱ्यापैकी प्रचार प्रसार धरणगाव-अमळनेर या देान्ही तालुक्यात झाला होता, तेथून पोलिसांना त्याचा सुगावा लागला. पोलिसांनी ज्यांच्याकडून वाहने जप्त केली आहेत ते घेणारेही या गुन्ह्यात संशयित आरेापी करण्यात येणार असल्याचे निरीक्षक बापू रेाहोम यांनी सांगितले.

डेरींगसाठी दारूचा आसरा..
चोरी करताना धाडस हवे..यासाठी वाहन लांबवण्यापूर्वी दोघेही दारू ढोसत..दिसायला गोरीपान व बाय कट करून शर्ट-पँट घातलेली ही महिला चोर वाहना जवळ जाऊन बनावट चावीने ते चोरताना निवृत्ती माळी ऊर्फ छोटू लांब उभा राहून पाळत ठेवत असे..दुचाकी लांबवली की, सुसाट वेगात दोघेही अमळनेरला पळ काढायचे अशी माहिती अटकेतील संशयितांनी तपास पथकाला दिली असून न्यायालयाने दोघांना २३ जुलै पर्यंत कोठडीत रवाना केले आहे. या देाघाकडून इतर वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस येणार असल्याचे निरीक्षक रेाहोम यांनी सांगितले.

संपादन ः- रईस शेख 

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com