शेतकऱ्याची आत्महत्या ; सोयाबीन नांगरला..कापूस किडला अन्‌ कर्जाचा डोंगर

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 4 August 2020

सोयाबीनवर नांगर फिरवला..कापूस उभा केला तर, त्यावर किडीचा पादृर्भाव झाला..मुलांच्या नावे बँकेतून घेतलेले कर्ज आता फेडणार कसे या विवंचनेत असलेल्या प्रकाश मानसींग पाटील या तरुण शेतकऱ्याने मुलांच्या नावे घेतलेल्या कर्जाचा धसका घेत​ शेतातच गळफास घेत आत्महत्या केली.

जळगाव, : - गेलवर्ष असच गेलं..यंदा श्रावण लागला तरी..झडी नाहीच, देान्ही मुलांच्या नावे कर्ज घेऊन शेत पेरलं..मात्र, सोयाबीन नांगरला कापूस किडला कर्ज फेडायचे कसे..शेतावरील कर्जाची माहिती घेत..अखेर शेतकऱ्याने शेतातच गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना जळगाव तालुक्यातील गाढोदा येथे घडली. प्रकाश मानसींग पाटील (वय-३१) असे मयत शेतकऱ्याचे नाव असून तालुका पोलिसांत आत्महत्येची नोंद करण्यात आली आहे.  

गेल्यावर्षी गारपीठ, अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले, यंदा दोन्ही मुलांच्या नावे कर्ज घेवून शेतपेरलं..त्यात पावसाने दडी मारल्याने अगोदर सोयाबीनवर नांगर फिरवला..कापूस उभा केला तर, त्यावर किडीचा पादृर्भाव झाला..मुलांच्या नावे बँकेतून घेतलेले कर्ज आता फेडणार कसे या विवंचनेत असलेल्या प्रकाश मानसींग पाटील या तरुण शेतकऱ्याने शेतातच गळफास घेत आत्महत्या केली. तत्पुर्वी गाव तलाठ्याकडून घेतलेल्या कर्जाची नुकतीच माहिती त्यांनी घेतली होती..मुलांच्या नावाने घेतलेल्या कर्जाचा घसका घेत त्यांनी टोकाचे निर्णय घेतल्याचे पेालिस पाटील भगवान पाटील यांनी दिली. घटनेची माहिती पोलीस पाटलांनी तालुका पेालीसांत कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळ गाठले. तत्काळ पंचनामा करून त्यांना जिल्‍हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केल्यावर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रकाश पाटील यांच्या पश्‍चात पत्नी सुनंदा, भरत व सचिन दोन मुलं सुना नातवंडे असा परिवार आहे. 
 

 संपादन - रईस शेख

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Farmer suicide; Soybean plow .. cotton kidla and a mountain of debt