रावेरच्या दंगलखोरांकडून वसूल करणार साडेसहा कोटी

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

कोरेाना संक्रमण काळात (22 मार्च) रावेर शहरात दंगल उसळली होती. त्यात पोलीस वाहनाची जाळपोळीसह घरांना आगी लावण्यात आल्या वाहने पेटवण्यात आली. दंगलीत यशवंत काशिनाथ मराठे या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोघांना गंभीर दुखापती झाल्या. पोलिसांत दाखल 7 गुन्ह्यांमध्ये 377 जणांना आरोपी करण्यात आले त्यात आतापर्यंत 157 अटक झाले आहे. तपासाअंती पोलिसांनी  निष्पन्न केलेल्या संशयीता कडून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा ८० पानांचा प्रस्ताव पोलिसदलाने जिल्हा प्रशासनाला सोपवला

जळगाव,  ः-  रावेर शहरात गेल्या ४२ वर्षात (१९४६ पासून) तब्बल ४२ जातीय दंगली उसळल्या आहेत. दंगल घडते, गुन्हे दाखल होतात, संशयितांना अटक होऊन ते सुटतात..पुन्हा गुन्हे करण्यासाठी मोकळे, असाच आजवर समज होता. मात्र, आता दंगलीघडवणाऱ्या संशयितांकडून संपूर्ण नुकसान भरपाई वसुलण्यात येणार आहे. रावेर दंगलीत झालेले सार्वजनिक मालमत्तेचे झालेले नुकसान, नागरिकाच्या मिळकतीची जाळपोळ आणि दंगल रोखण्यासाठी ४० दिवस पेालिसांचा बंदोबस्त खर्च असा एकूण ६ कोटी २० लाख ९० हजार १५९ रुपयांची वसुली साठी मालमत्तांवर टाच आणण्यात येणार असल्याचा प्रस्ताव पेालिसदलाने तयार करून जिल्‍हाधिकाऱ्यांना सोपवल्याचे अप्पर अधीक्षक भाग्यश्री नवटके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

<iframe src="https://www.facebook.com/plugins/video.php?href=https%3A%2F%2Fwww.facebo..." width="560" height="308" style="border:none;overflow:hidden" scrolling="no" frameborder="0" allowTransparency="true" allowFullScreen="true"></iframe>

कोरेाना संक्रमण काळात (22 मार्च) रावेर शहरात दंगल उसळली होती. त्यात पोलीस वाहनाची जाळपोळीसह घरांना आगी लावण्यात आल्या वाहने पेटवण्यात आली. दंगलीत यशवंत काशिनाथ मराठे या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला. तर दोघांना गंभीर दुखापती झाल्या. पोलिसांत दाखल 7 गुन्ह्यांमध्ये 377 जणांना आरोपी करण्यात आले त्यात आतापर्यंत 157 अटक झाले आहे. तपासाअंती पोलिसांनी  निष्पन्न केलेल्या संशयीता कडून झालेल्या नुकसानाची भरपाई करण्याचा ८० पानांचा प्रस्ताव पोलिसदलाने जिल्हा प्रशासनाला सोपवला असून दंगलखोराकडून नुकसान भरपाई वसूल झाल्यास हा जळगाव पॅटर्न राज्यभर दंगलखोरांवर जरब बसवण्यासाठी प्रभावी उपचार ठरणार आहे. पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक भाग्यश्री नवटके , उपविभागीय अधिकारी नरेंद्र पिंगळे, पोलीस निरीक्षक बापू रोहम, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी प्रस्ताव तयार केला आहे.

रावेरतील हे परिसर अशांत
रावेर शहरात यापूर्वीही नागझिरी, रसलपूर नाका, लेंडी पुरा, शिवाजी चौक, भोईवाडा, संभाजी नगर, बंडू चौक, खाटीक वाडा, मन्यारवाडा या भागात दंगली घडलेल्या आहेत. निमझरी, रसलपूर नाका, लेंडी पुरा, कोतवाल वाडा, चावडी चौक, शिवाजी चौक, भोईवाडा, संभाजी नगर, इमामवाडा, पंचशील चौक, बंडू चौक, खाटीकवाडा, मन्यारवाडा, गांधी चौक, हातेशा मशीद, थळा भाग, पाराचा गणपती, महात्मा फुले चौक, आठवडे बाजार या भागांमध्येच वारंवार दंगली उसळत असल्याने महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 51 (1) (अ) (ब) नुसार या भागांना अशांत अघोषित करून तपासात निष्पन्न आरोपींकडून नुकसान भरपाई वसूल करावी, असा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. 

साडेसहा कोटीची वसुली होणार..
22 मार्च रोजी या दंगलीत नागरिकांच्या मालमत्तेची जाळपोळ-तोडफोड करून नुकसान केले हेाते. या सर्व नुकसानाचे अप्पर जिल्‍हाधिकारी,तहसीलदार, नगरपालिका, वीज मंडळाचे अधिकारी यांच्या तर्के पंचनामे करून नुकसानाची रक्कम दंगल राखण्यासाठी नियुक्त पोलीस  बंदोबस्ताचा खर्च अशी एकूण 6 कोटी 14 लाख 92 हजार 159 निश्चित करण्यात आली असून हा सर्व खर्च संबंधित आरेापीतांकडून वसूल करण्यात यावी असा प्रस्ताव पेालिसदलाने जिल्‍हाधिकारी अभिजित राऊत यांना सादर केला आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांनी याला मंजुरी दिल्यास त्याला न्यायालयातही अपील करता येणार नाही.

- वसुलीचा जळगाव पॅटर्न व्हावा...
 
सर्वसामान्यांच्या मालमत्तांचे अधीक नुकसान होते. कोणीतरी गुन्हा करतो, त्याची शिक्षा सर्वसामान्य नुकसान म्हणून भोगतो. मुंबई पोलीस  अधिनियमातील कलम-५१,५२, ५३, ५४ अन्वये नुकसान भरपाई करण्याचे अधिकार जिल्‍हाप्रशासनाला प्राप्त असून त्याचा प्रभावी वापर करून रावेर दंगलीत झालेल्या नुकसानाचे संबधीत विभागाकडून पंचनामे करून प्रस्ताव जिल्‍हाधिकाऱ्यांना सोपवला आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास राज्यभरात दंगलखोरांकडून वसुलीचा जळगाव पॅटर्न वापरल्यास गुन्हेगारीला जरब बसेल…
- भाग्यश्री नवटके
अप्पर पेालिस अधीक्षक, जळगाव 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Six and a half crore will be recovered from Raver's rioters