जळगाव मार्गे गांजाची तस्करी..सहाशे छत्तीस किलो गांजासह ट्रक ताब्यात; एमआयडीसी पेालीसांची कारवाई

Smuggling of cannabis through Jalgaon. Action of MIDC police
Smuggling of cannabis through Jalgaon. Action of MIDC police

जळगाव, -ः मुक्ताईनगर-जळगाव मार्गे तस्करी होणाऱ्या गांजाची मोठी खेप एमआयडीसी पेालीसांच्या हाती लागली आहे. लाखो रुपये किंमतीचा जवळपास सहा टन(६३६ किलो) इतका मोठा गांजाचा साठा एमआयडीसी पेालीसांनी पकडला असून रात्री उशिरा पर्यंत मोजणी, पंचनामे, जप्ती व अटकेची कारवाई सुरु होती.  

विदर्भातून मुक्ताईनगर-जळगाव मार्गे तस्करी गांज्याची मोठी खेप पाठवण्यात आली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विशाल सेानवणे यांना खबऱ्याने गुप्त माहिती कळवली. पहाटे सहा वाजेपासून एमआयडीसी पोलीसांच्या तीन वेगवेगळ्या टिम निरीक्षक विनायक लोकरे यांच्या मार्गदर्शनात नियुक्त करण्यात आल्या होत्या. उपनिरीक्षक विशाल वाठोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसीग पाटील, रामकृष्ण पाटील, हेमंत कळस्कर, राजेंद्र कांडेलकर, निलेश पाटील, इम्रान सैय्यद,येागेश वराडे आदी नागपुर मुंबई महामार्गावर जळगाव टोलनाका, नशिराबाद-उमाळा मार्गे औरंगाबाद, अजिंठा चौक ते गाढेगाव घाट अशा तीन पथकांतर्फे मिळालेल्या गुप्त माहितीच्या ट्रकचा शोध सुरु होता.दुपारच्या सुमारास ट्रक (एमएच.४२.टि.९१२५) भुसावळ कडून येत असतांना जळगाव जकात नाक्या जवळ आढळून आला. तेथून पुढे आल्यावर पोलिस पथकाने त्याला थांबवले. चालक मुक्तार रहिम पटेल (वय-२४,रा.लोहारा-बालापूर अकोला) याने निसटण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याला तत्काळ ताब्यात घेण्यात आले. ट्रकची तपासणी केल्यावर त्यात घातक अंमलीपदार्थ गणला जाणाऱ्या गांजाच्या गठाणी आढळून आल्यावर सहाय्यक पोलीस अधीक्षक डॉ.नीलाभ रेाहन घटनास्थळी दाखल झाले. सरकारी पंचा समक्ष इलेक्ट्रॉनीक काट्याद्वारे जप्त मालाची मोजणी सुरु होती. चालकाला विचाराणा केली असता त्याने माहिती नसल्याचे सांगीतले. रात्री उशिरा पर्यंत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सरु होते. 

पामच्या रेापात लपवली पेाती
गांज्याने भरलेली २४ पेाती माल टाकल्यानंतर मागून पाम चे रेाप ठेवण्यात आले होते. जेणे करुन पोलिसांनी वाहन थांबवले तरी पामच्या रोपांची वाहतुक करत असल्याचे आढळून येईल. 

लाखोंचा गांजा
प्रचलीत बाजार भावानुसार ४ ते ६ हजार रुपये किलो दराचा गांजा जप्त केलेल्या ट्रकमध्ये आढळला आहे.प्रतवारीनुसार किलो मागे दोन हजारांचा फरक पडतो, ४ हजाराच्या दराने सहाशे किलो गांजा २४ लाख रुपयांचा हेातो. दर्जा आणखी चांगला असल्यास दर वाढतो.जप्त मुद्देमालात पामचे झाडे आणि ट्रकचाही समावेश आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com