video ; बघा कसे पळाले.. जेल रक्षकाला पिस्तुल लावून तिन कैदी फरार

Three prisoners escaped with pistols to the prison guard
Three prisoners escaped with pistols to the prison guard

- कारागृहात पिस्तुल-मोबाईल आले कोठून हे माहित नाही ;
- अधीकारी रडताय तटबंदी, जास्त कैदी अन्‌ कमी स्टाफ साठी


जळगाव : जिल्‍हाकारागृहातील सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर पिस्तुल लावून विवीध गंभीर गुन्ह्यात तीन कैदी सकाळी ७ः३० वाजता जिल्‍हाकारागृहातून पळून जाण्यात यशस्वी ठरले आहे. सागर संजय पाटील (पैलाड’अमळनेर),गैारव विजय पाटील रा.तांबापुरा, अमळनेर) आणि पेालिसदलातील बडतर्फ पोलिस  सुशील अशोक मगरे (पहूर, ता.जामनेर) अशा तिघांचा समावेश आहे. गुन्हा घडल्यानंतर जिल्‍हापेठ पेालिसांसह नियंत्रणकक्षाला माहिती दिल्यावर वरीष्ठ अधिकाऱ्यांनी कारागृहात धाव घेतली. 

जिल्‍हाकारागृहातील न्याबंदी सागर संजय पाटील, गौरव विजय पाटील(दोन्ही रा. अमळनेर,) हे दोन्ही दरोडा, दंगलीच्या गुन्ह्यातील संशयीत १२ डीसेंबर 2019 मध्ये जिल्‍हा कारागृहात न्यायबंदी म्हणुन ठेवण्यात आले होते. तर, बारा दिवसानंतर सुशील अशेाक मगरे हा बडतर्फ पेालीस पुणे येथील सराफा दुकानात गोळीबार करुन लूटल्या प्रकरणी २४ डीसेंबर २०१९ रोजी कारागृहात आला होता. तिन्ही संशयीतांनी आज सकाळी सुरक्षा रक्षकाला पिस्तूल लावून मारहाण करीत सकाळी साडेसात वाजता सिनेस्टाईल पलायन केल्याची धक्कादायक घटना घडली. घटनेचे वृत्त तत्काळ कारागृह अधीक्षकांनी जिल्‍हापेठ पेालिस ठाणे,पोलिस नियंत्रणकक्षाला कळवले. निरीक्षक अकबर पटेल यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहाय्यक पोलिस अधीक्षक डॉ.नीलाभ रेाहन, गुन्हेशाखेचे निरीक्षक बापू रोहोम अशांनी भेट देत मारहाण करण्यात आलेल्य कर्मचाऱ्यांना विचारपुस केल्यावर जाब-जबाब नोंदवण्यात आले. प्रभारी कारागृह अधीक्षक राजेंद्र बी.मरळ यांच्या तक्रारीवरुन जिल्‍हापेठ पेालिस ठाण्यात तिघा कैद्यांसह त्यांना पळवून नेणाऱ्या जगदीश पुंडलीक पाटील (वय-२०,रा.पिंपळकोठा. ता, एरंडेाल)अशा चौघांच्या विरुद्ध गुन्ह्याची नेांद करण्यात आली आहे. जिल्‍हापोलिस अधीक्षक डॉ.उगले यांनी तपासाला गती दिली असुन संशयीतांच्या अटकेसाठी विवीध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


संपादन - रईस शेख

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com