एकाच हॉटेल मध्ये दोन लग्न..पोलीसांनी पैसे उळल्याची तक्रार

Two marriages in the same hotel .. Complaint of money laundering by the police
Two marriages in the same hotel .. Complaint of money laundering by the police
Updated on

जळगाव,- शहरातील क्रेझी होम या हॉटेल मध्ये एकाच तारखेला दोन लग्नांचे आयेाजन करण्यात आले होते. लॉकडाऊन मध्ये पुर्वपरवानगीने आयेाजीत या विवाह सोहळ्याच्या आयोजका कडून पेालिसांनी पाच हजार रुपये खंडणी घेतल्याची तक्रार सचिन अनील सोनार यांनी पेालिस अधीक्षकांसह गृह विभागाला केली आहे. 

सचिन अनील सेानार यांनी दिलेल्या प्रसीद्धी पत्रकात नमुद केल्या प्रमाणे, २५ जुन रेाजी हॉटेल क्रेझी होम येथे देान वेगवेगळ्या मजल्यावर वेगवेगळ्या परिवाराचा विवाह सोहळा आयोजीत करण्यात आला होता. त्यासाठी पेालिस ठाण्यासह जिल्‍हाधिकारी कार्यालयाची पुर्व परवानगी घेण्यात आलेली होती. असे असतांना रामानंदनगर पेालिस ठाण्यातून विश्‍वनाथ गायकवाड आणि रविंद्र पाटील असे दोन कर्मचारी तपासणीला आले. त्यांनी पहाणी केल्यानंतर हॉटेल मालक चंद्रशेखर अग्रवाल, आयोजक सचिन सोनार अशा दोघांना पेालिस ठाण्यात बोलावून लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केले म्हणुन कारवाईचा दम दिला. ५० हजारांची मागणी केल्यांनतर तडजोडी अंती सचिन सोनार यांनी पाच हजार रुपये देऊन प्रकरण मिटवले आणि समज पत्रावर सह्या घेवुन सेाडून दिले. घडल्या प्रकाराची सेानार वरीष्ठांना तक्रार करणार याची जाणीव झाल्याने देाघेही सेानार यांच्या मागावर होते. अशातच १ जुलै रेाजी सचिन सेानार याचा वाहन अपघात झाल्याने गेल्या महिन्याभरापासुन ते रुग्णालयात दाखल होते. आज या बाबत लेखी स्वरुपात जिल्‍हा पेालिस अधीक्षक, पोलिस महानिरीक्षक आणि गृह विभागाला तक्रार करुन संबधीतांवर कारवाईची मागणी केली आहे.


संपादन - रईस शेख 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com