..त्याने का..घेतली पाचव्या मजल्यावरुन उडी; कुटुंबीयांना मानसिक धक्का

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 जुलै 2020

अपार्टमेंट मधील रहिवासी रात्री झेापण्याच्या तयारीत असताना जोराचा आवाज झाल्याने काहींनी अवाजाच्या दिशेने शेाध घेतल्यावर कोणीतरी वरून उडी घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती तालुका पेालिसांना कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. संदीपला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तपासणी अंती डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

 

जळगाव,  ः- शहरातील खोटेनगर परिसरात हॉटेल राधिका समोरील पंडित कॉर्नर या पाच मजली अपार्टमेंट वरून रात्री अकराच्या सुमारास पस्तीस वर्षीय तरुणाने उडी घेत आत्महत्या केली. तरुणाने उडी घेतल्यानंतर परिसरातील रहिवाशांना आवाज आल्याने त्यांनी धाव घेतल्यावर प्रकार समोर आला. तालुका पेालिसांना पाचारण केल्यानंतर या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

मूळ अव्हाणे (ता.जळगाव) येथील रहिवासी असलेल्या धर्मराज निरखे यांनी बारा वर्षापूर्वीच मुलांच्या व्यवसाय आणि शिक्षणासाठी स्थलांतर केले होते. त्यांचा मुलगा संदीप धर्मराज निरखे(वय-३५) हा वेल्डिंग आणि फॅब्रीकेटींगचा कुशल कारागीर होता. कुटुंबात पत्नी एक मुलगी, आई-वडील, भाऊ वहिनी असा परिवार असून आर्थिक परिस्थिती बऱ्यापैकी होती. काल रात्री अकरा वाजेच्या सुमारास संदीप निरखे याने पाचव्या मजल्यावरून उडी घेतली. अपार्टमेंट मधील रहिवासी रात्री झेापण्याच्या तयारीत असताना जोराचा आवाज झाल्याने काहींनी अवाजाच्या दिशेने शेाध घेतल्यावर कोणीतरी वरून उडी घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती तालुका पेालिसांना कळवल्यावर पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. संदीपला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, तपासणी अंती डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले. तालुका पोलिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून संदीपच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नसून तपासात विषय उघडकीस येईल

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: jalgaon marathi news;Young man commits suicide by jumping from fifth floor