स्पोर्टस् क्लाससाठी पप्पांना हट्ट..त्याच स्पोर्टस् दोरीने केला घात 

Younger girl dies after being strangled by athletics
Younger girl dies after being strangled by athletics
Updated on: 

जळगाव, ः- शहरातील दादावाडी कृष्णपुरी सोसायटीतील २१ वर्षीय तरुणीचा स्पेार्टस(ॲथलॅटीक्स) दोरीने गळफास लागून मृत्यु झाल्याची घटना मंगळवार (ता.२८) रेाजी संध्याकाळी घडली. सायली बाळासोब पाटील (वय-२१) असे मयत तरुणीचे नाव असून ती, ॲथलॅटीक्सची खेळाडू होती. काही दिवसांपुर्वीच तीने वडिलांना ॲथलेटिक्सचा क्लास लावून देण्यासाठी हट्टही धरला होता. मात्र, केारोना मुळे ती घरीच प्रॅक्टीस करत होती. तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

तालुका पेालिसांनी दिलेल्या माहिती नुसार, मंगळवारी सायंकाळी ७ वाजेच्या  सुमारास दादावाडी परिसरातील विद्युत पुरवठा बंद झाला होता.त्यावेळी सायली तीच्या आई सोबत घरताच होती. वडील बाळासाहेब पाटील व भाऊ विश्वेश पाटील मेडिकलवर गेले होते. लाईट नसल्याने सायलीची आई घराबाहेर शेजारी महिलांशी गप्पा मारत असताना सायली बेडरुमच हेाती. साडेसात वाजेनंतर सायलीची आई घरात आल्यानंतर  मुलीला गळफास लागल्याचे दिसताच त्यांनी आक्रोश केला.शेजाऱ्यांनी मदतीला धाव घेत सायलीला तत्काळ रुग्णालयात हलवले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृतघोषीत केले. ॲथलेटिक्स साठी क्लास लावायचा हट्ट ती कुटुंबीयांकडे करत होती. मात्र, कोरोनाचा संसर्ग सुरू असल्याने वडीलांनी नकार दिला. कोरेाना कमी झाल्यावर क्लास लावू असे सांगीतलेही होते मात्र, तत्पुर्वीच तिचा  त्याच दोरीने  मृत्यु ओढवला तालुका पेालिसांत या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून तपास पोलीस  नाईक ईश्‍वर लोखंडे करीत आहेत. 

संपादन - रईस शेख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon gold price
Jalgaon Scrap Market, Municipal Land, Transport Nagar
Four Suspects Held by Jalgaon Police
Nandurbar bribery case
Marathi News Esakal
www.esakal.com