Jalgaon Encroachment : राखीव 42 हेक्टर जंगलावरील अतिक्रमणावर बुलडोझर; वन विभागाची मोठी मोहीम

Encroachment : वन विभागाच्या अडावद परिमंडळातील राखीव वनखंड क्रमांक १९७ मधील ४२.०१ हेक्टर वनजमिनीवर अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण केले होते.
Excavation done by JCB to remove encroachment on reserved land of forest department here.
Excavation done by JCB to remove encroachment on reserved land of forest department here.esakal

Jalgaon Encroachment : वन विभागाच्या अडावद परिमंडळातील राखीव वनखंड क्रमांक १९७ मधील ४२.०१ हेक्टर वनजमिनीवर अज्ञात व्यक्तींनी अतिक्रमण केले होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या आदेशान्वये महसूल व वन विभागातील अधिकाऱ्यांसह १०० कर्मचाऱ्यांनी मंगळवारी (ता. २) व बुधवारी (ता. ३) सायंकाळपर्यंत अशी दोन दिवस ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली. त्यात ३३ जेसीबींद्वारे अतिक्रमण काढून त्या जमिनीवर खोल समतलचर खोदण्यात आले. (bulldozer operation by forest department on encroachment of 42 hectares )

या राखीव वनजमिनीवरील अज्ञात व्यक्तींनी अनधिकृतपणे केलेली शेती व अतिक्रमण काढण्याबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व पोलिस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी यांच्याशी चर्चा करून आदेश देण्यात आले. त्यानुसार ही अतिक्रमित शेती व वनजमिनीवरील अतिक्रमण काढण्यात आले. (latest marathi news)

Excavation done by JCB to remove encroachment on reserved land of forest department here.
Nashik Encroachment : कॉलेज, गंगापूर रोडवर सलग दुसऱ्या दिवशी मोहीम! 50 पक्क्या अतिक्रमणांवर हातोडा

यावल वन विभागाचे उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश हडपे (चोपडा), सहाय्यक निरीक्षक संतोष चव्हाण (अडावद), वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत साबळे (अडावद), वनपरिक्षेत्र अधिकारी बी. के. बोग (चोपडा), वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एम. सोनवणे (वैजापूर), वनपरिक्षेत्र अधिकारी जी. आर. बजगुजर (देवझिरी), यावल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी ए. सी. पाटील (गस्तीपथक) यांच्यासह चोपडा तहसील कार्यालयातील महसूल नायब तहसीलदार, अव्वल कारकून, उपवनविभागातील वनपाल, वनसंरक्षक, अडावद पोलिस ठाण्यातील कर्ममारी, वनमजूर असे एकूण १०० पुरुष व महिला कर्मचाऱ्यांनी ही अतिक्रमण निर्मूलन मोहीम राबविली.

या मोहिमेत मंगळवारी ७७.०१ पैकी ३५ हेक्टर क्षेत्रात १३ जेसीबी मशिनने खोल सलग समतल चर खोदून अतिक्रमण काढण्यात आले. बुधवारी २० जेसीबींच्या माध्यमातून खोल चर खोदकाम करून सायंकाळी सहापर्यंत उर्वरित असे एकूण ४२.०१ हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण काढण्यात आले. यात कोणालाही वैयक्तिक आर्थिक नुकसान वा जीवितहानी झाली नाही. दरम्यान, वन विभागाच्या राखीव क्षेत्रात कोणीही अतिक्रमण करू नये, शिवाय पात्र जमीनधारकांनी आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त जास्तीचे अतिक्रमण करू नये, असे आवाहन सहाय्यक वनसंरक्षक प्रथमेश हडपे यांनी केले आहे.

Excavation done by JCB to remove encroachment on reserved land of forest department here.
Nashik Encroachment : ग्राहकांनी वाहने पार्क करावी कुठे? रस्त्यावर व्यावसायिकांचे अतिक्रमण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com