esakal | कोरोनामुळे पिंप्राळ्याचा रथोत्सव साधेपणाने; पाच पावले रथ ओढला
sakal

बोलून बातमी शोधा

Pimprala chariot festival

कोरोनामुळे पिंप्राळ्याचा रथोत्सव साधेपणाने; पाच पावले रथ ओढला

sakal_logo
By
देविदास वाणी

जळगाव ः प्रतीपंढरपूर म्हणून प्रसिध्द असलेल्या येथील पिंप्राळाचा रथोत्सव (Chariot festival of Pimprala) यंदाही सलग दुसऱ्या वर्षी केवळ पाऊले चालून.. भक्तीमय वातावरणात साजरा झाला. १४६ वर्षांची परंपरा (Tradition) असलेला हा उत्सव आहे. रथोत्सव ‘जानकाबाई की जय..’या जयघोषाने परिसर दुमदुमला होता.

(jalgaon pimprala ashadi ekadashi chariot festival)

Pimprala chariot festival

Pimprala chariot festival

रथोत्सवामुळे कोरोना संसर्गामुळे यंदा श्री विठ्ठल मंदिर (Vitthal Temple) संस्थानतर्फे भजनी मंडळ, विश्वस्त व उपस्थित मान्यवरांची सकाळी ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली होती. आलेल्या भाविकांना देखील सॉनेटराईज करून नंतर दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला. यानंतर शासकीय आदेशाचे पालन करून रथाची महापूजा व महाआरती करून रथ पाच पाऊले पुढे ओढून प्रतिनिधिक व साध्या स्वरूपात साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल मंदीरात पहाटे साडेपाचला विश्‍वस्त रूपेश विलास वाणी यांनी सपत्नीक महाअभिषेक करून श्री विठ्ठल रूख्मीणीची पुजा केली. रथावरील मुर्ती (हनुमान, अर्जुन, गरूड, घोडे) यांची विधिव्रत पुजा (अभिषेक) विश्‍वस्त संजय प्रभाकर वाणी यांनी सपत्नीक केली.

Pimprala chariot festival

Pimprala chariot festival


यावर्षी स्थाची महापुजा सकाळी आठला रथोत्सवसमितीचे अध्यक्ष अनिल पुरूषोत्तम
वाणी यांनी सपत्नीक यांनी केली. रथाची महाआरती सकाळी ८.१५ ला स्थानिक ग्रामस्थ मंडळी, नगरसेवक, शांतता समिती सदस्य, वाणी समाज प्रतिनिधी, विश्‍वस्त अक्षय प्रमोद वाणी, कल्पेश सोमनाथ वाणी, मोगरी लावणारे, स्वयंसेवक, पुजारी श्याम जोशी व भजनी मंडळ अरूण पाटील, रमेश महाजन यांचे उपस्थितीत करण्यात आली. त्यावेळी माजी पोलिसपाटील विष्णु पाटील, शांतता समिती सदस्य संजय सोमाणी, शशिकांत साळवे, अतुल बारी, माजी नगररसेवक आबा कापसे, नगरसेवक मयूर कापसे, विजय पाटील, मोगरी लावणारे स्वयंसेवक पुरूषोत्तम सोमाणी, पितांबर देवाजी कुंभार, अध्यक्ष मोहनदास वाणी, उपाध्यक्ष सुनिल वाणी, सेक्रेटरी योगेश चंदनकर आदी उपस्थित होते. दुर्गेश वाणी, गिरीष वाणी, मयुर पंडित, चिराग वाणी, प्रमोद वाणी, तेजस चंदनकर आदींनी सहकार्य केले.

loading image