Jalgaon Anganwadi Sevika : गावपातळीवर अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची : आमदार चिमणराव पाटील

Jalgaon Anganwadi Sevika : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार अथवा शैक्षणिक उपक्रमांसाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते.
MLA Chimanrao Patil distributing smartphones to Anganwadi sevika.
MLA Chimanrao Patil distributing smartphones to Anganwadi sevika. esakal
Updated on: 

Jalgaon Anganwadi Sevika : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पोषण आहार अथवा शैक्षणिक उपक्रमांसाठी अंगणवाडी सेविकांची भूमिका महत्त्वाची असते. त्याचबरोबर विविध योजना ग्रामस्थांच्या दारापर्यंत पोहोचविण्याचे कार्य अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून अत्यंत चोख होत असते, असे गौरोद्गार आमदार चिमणराव पाटील यांनी काढले. (Jalgaon MLA Chimanrao Patil statement Role of anganwadi workers at village level is important)

शासनाच्या महिला व बाल विकास विभागाकडून एकात्मिक बाल विकास सेवा योजना पारोळा कार्यालयांतर्गत गुरुवारी (ता. १४) अंगणवाडी सेविकांना ‘स्मार्ट मोबाईल फोन’ वितरण सोहळा आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी गटविकास अधिकारी किशोर शिंदे, विस्तार अधिकारी सुनील पाटील, बालविकास प्रकल्प अधिकारी एस. आर. धनगर यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

या वेळी आमदार पाटील यांनी बाल विकास प्रकल्प अंतर्गत शासनाच्या योजनांची माहिती देत गरजू लाभार्थ्यांना लाभ द्यावा, असे आवाहन केले. (latest marathi news)

MLA Chimanrao Patil distributing smartphones to Anganwadi sevika.
Jalgaon News : वित्तीय संस्थांचे 22 लाखांचा दंड वसुल; ग्रामपंचायत थकबाकी वसूलीला शून्य प्रतिसाद

पारोळा कार्यालय अंतर्गत एकूण २१४ अंगणवाडी केंद्र आहेत व मुख्यसेविका ५ आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागील काही काळापासून पोषण अभियानांतर्गत पोषण ट्रेकर ॲपमध्ये नोंदी होत नसल्यामुळे कामकाजावर परिणाम होत होता."पोषण अभियान अंतर्गत २०२३-२४ या आर्थिक वर्षात अंगणवाडी सेविका व मुख्यसेविका यांना सुमारे २१९ स्मार्ट मोबाईल फोन वितरित करण्यात आले आहेत.

बाल विकास सेवा योजना कनिष्ठ सहाय्यक शीतल सोनवणे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

MLA Chimanrao Patil distributing smartphones to Anganwadi sevika.
Jalgaon Smita Wagh : भाजप उमेदवार स्मिता वाघ यांची एरंडोलला भेट; पदाधिकाऱ्यांशी साधला संवाद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Anjali Tuplondhe
Maharashtra Anganwadi workers promotion age limit,
Gokul Milk Union Election Update Samvichari Alliance Fields 16 New Candidates Along With Six Former Directors and a Former MLA
Over 150000 Anganwadi Workers to Benefit From 50 Percent Honorarium Hike Announced by Yogi Government in Uttar Pradesh
Marathi News Esakal
www.esakal.com