
जळगाव : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते माझा सत्कार होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. माझ्यासाठी हा आनंदाचा, सौभाग्याचा क्षण होता, अशा भावना लखपती दीदी वंदना प्रभाकर पाटील (रा. पळासखेडा, ता. जामनेर) यांनी ‘सकाळ’कडे व्यक्त केल्या. लखपती दीदी संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लखपती दीदींचा सत्कार प्रमाणपत्र देवून झाला. या पार्श्वभूमीवर ‘सकाळ’ प्रतिनिधीने लखपती दीदींशी संवाद साधला. (moment of honor good fortune joy at hands of PM Modi Lakhpati Didi)