Jalgaon News : मोठे वाघोदा गॅस्ट्रो रुग्णसंख्या 38 वर! आरोग्य यंत्रणा व ग्रामपंचायतीची धावपळ

Jalgaon : मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रोसदृश साथीच्या रुग्णांची वाढ होत आहे. आज नवीन ११ रुग्णांची भर पडली असून, रुग्णसंख्या ३८ झाली आहे.
Tehsildar B. while inspecting the pipeline in the drain which caused the cultivation of gastro on Wednesday. A. Cotton and officials.
Tehsildar B. while inspecting the pipeline in the drain which caused the cultivation of gastro on Wednesday. A. Cotton and officials.esakal

Jalgaon News : मोठा वाघोदा येथील गॅस्ट्रोसदृश साथीच्या रुग्णांची वाढ होत आहे. आज नवीन ११ रुग्णांची भर पडली असून, रुग्णसंख्या ३८ झाली आहे. नवीन अकरा रुग्णांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून, इतर रुग्णांवर सावदा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, तहसीलदार बी. ए. कापसे यांनी भेट देऊन पाहणी केली. ही साथ आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणेशी संवाद साधून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. ( motha Waghoda gastro patients number up to 38 in village)

मोठे वाघोदा येथे दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोची लागण झाल्याची घटना मंगळवारी (ता. २१) घडली. वाढती रुग्णसंख्या, त्यात आरोग्य यंत्रणेचा बेजबाबदारपणा असल्याचे हे प्रथमदर्शनी चित्र आहे. वाघोदा बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्रात औषध साठा व सोय नसल्याने पाच रुग्णांना रुग्णवाहिकेने सकाळी निंभोरा आरोग्य केंद्रात उपचारार्थ हलविण्यात आले. एक रुग्ण जळगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे.

त्याची तब्येत खालावली असून, त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. लागण झालेल्या रुग्णांमध्ये दीड वर्षाच्या बालकाचा समावेश आहे. मंगळवारी उपचार घेतलेले रुग्ण घरी आले. मात्र, परत तोच त्रास जाणवत असल्याने पुन्हा उपचार घेण्यासाठी दाखल व्हावे लागले. काही रुग्णांनी आरोग्य विभागाविषयी नाराजी व्यक्त केली. अर्धवट उपचार करून सोडून देत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे.

येथे उपचार होत नसल्याने काहींनी खासगी रुग्णालयात जाणे पसंत केले. आज तीन रुग्ण सावदा येथे खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल झाले. वाघोदा आरोग्य सहाय्यक यांच्याकडून रुग्णांवर वाघोदा केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. बुधवारी (ता. २२) दुपारी रावेरचे तहसीलदार बी. ए. कापसे यांनी आरोग्य केंद्राला भेट दिली. (latest marathi news)

Tehsildar B. while inspecting the pipeline in the drain which caused the cultivation of gastro on Wednesday. A. Cotton and officials.
Jalgaon News : सरकारी योजनांचे पैसे लवकरच लाभार्थ्यांना ‘युपीआय’मार्फत!

उपचार घेत असलेल्या रुग्णांची विचारपूस केली. तसेच, बेघर वस्तीत राउंड मारत रहिवासी रुग्णांची भेट घेत आरोग्य विभाग व ग्रामपंचायतीला सूचना केल्या. ज्या भागात रुग्णसंख्या वाढत आहे, त्या बेघरवस्तीत पाइपलाइन गटारीजवळून गेली आहे. बेघरवस्तीतील रहिवाशांनी ही बाब तहसीलदार कापसे यांच्या निदर्शनास आणून दिली. गावातून वाहणाऱ्या नाल्यातून ही पाइपलाइन गेली आहे, त्यात काही गळती आहे का याचा शोध तहसीलदारांनी घेण्याचा प्रयत्न केला.

काही ठिकाणी गळतीचा संशय आला. त्यांनी त्वरित गळती तपासण्यात यावी व पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात यावेत, अशा सूचना ग्रामपंचात कर्मचाऱ्यांना केल्या. आशा सेविका व आरोग्यसेवक यांच्यातर्फे सर्व गावात गॅस्ट्रोसदृश आजाराच्या रुग्णांची माहिती गोळा करण्यात येत होती. पाणी तपासणी करण्याचे कामही सुरू करण्यात आले.

आरोग्य अधिकारी डॉ अजय रिंढे यांनी बुधवारी आरोग्य केंद्राला भेट देत माहिती घेतली व सूचना केल्या. जे रुग्ण मंगळवारी उपचार घेत होते, तेच रुग्ण पुन्हा उपचारार्थ बुधवारी रुग्णालयात दाखल झाले. नव्याने अकरा रुग्णांची बुधवारी भर पडली. दरम्यान, सावदा येथील खासगी रुग्णालयात २१ व निंभोरा उपकेंद्रात सहा सदृश रुग्ण दाखल झाले होते.

Tehsildar B. while inspecting the pipeline in the drain which caused the cultivation of gastro on Wednesday. A. Cotton and officials.
Jalgaon News: महापालिकेतर्फे पावसाळपूर्व नाले सफाईला प्रारंभ! 5 मोठ्यांसह 123 लहान नाल्यांची स्वच्छता; नागरिकांमध्ये समाधान

डॉ. सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये रामदास सखाराम बोधडे (वय ४१), रितेश युवराज आढाळे (२०), शरीफ कादीर तडवी (३०), खुशाल कडू बेलदार (३५), अरुण माधव कचरे (५०), डॉ. अजित पाटील यांच्या रुग्णालयात प्रमोद समाधान तायडे (१९), आम्रपाली भीमराव वाघ (१८), जानवी भीमराव वाघ (१५), तक्ष दीपक वाघ (२ वर्षे ६ महिने), पल्लवी राहुल वाघ (३०), कल्पना सुपडू वाघ (५५), अश्वजा नरेंद्र वाघ (१०), मोठा वाघोदा उपकेंद्रात कमलाकर सुपडू भालेराव (४१), आरिफा नामदार तडवी (३५), रेखा सुपडू वाघ (४०), कुमार नानू सुपे, आरिफा इस्माईल तडवी (२०), तय्यब सुभान तडवी (२६), निंभोरा केंद्रात जुबेदा नथू तडवी (५०), जोहरा सुभान तडवी (५०), हाजर सुभान तडवी, मुस्कान मुबारक तडवी (१६), साबिया मुळा तडवी (१५), कविता राहुल भालेराव (२०), सिमरन भीमराव वाघ (१७), श्रेया विशाल ससाने (२७) आदी रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Tehsildar B. while inspecting the pipeline in the drain which caused the cultivation of gastro on Wednesday. A. Cotton and officials.
Jalgaon News : जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक अनुभवणार वन्यप्राण्यांचा थरार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com