Jalgaon Mother and Son Case
esakal
जळगाव : घरांसह कॉलन्यांत सार्वजनिक मंडळांतील गणपती स्थापनेची तयारी सुरू असताना, हेमांगी निखिल महाजन (वय ३०, रा. तळेले कॉलनी, दशरथनगर, जळगाव) यांनी मुलगा शौर्य (वय ५) याच्यासह गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (ता. १४) सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. हेमांगी महाजन यांचे पती सैन्य दलात कार्यरत आहेत.