बांधकाम नकाशानुसार असल्यावरच पूर्णत्वाचा दाखला : विद्या गायकवाड

JMC Commissioner Vidya gaikwad with officials
JMC Commissioner Vidya gaikwad with officialsesakal

जळगाव : नियमानुसार अर्ज केल्यानंतर बांधकामास (construction) परवानगी देण्यात येईल, नकाशानुसार बांधकाम केले असेल तर बांधकाम पूर्णत्वाचा दाखला (construction completion certificate) देण्यात येईल, असे आदेश महापालिका आयुक्त विद्या गायकवाड (JMC Commissioner Vidya Gaikwad) यांनी दिले. शनिवारी (ता. १८) त्यांनी अधिकाऱ्यांसह प्रत्यक्ष बांधकाम साइटवर जाऊन पाहणी केली. (jalgaon municipal commissioner Vidya Gaikwad statement for construction completion certificate Jalgaon News)

शहरातील वास्तुविशारद, आर्किटेक, इंजिनिअर्स व क्रेडाई असोसिएशनची बैठक गेल्या महिन्यात आयुक्त विद्या गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी बांधकाम परवानगी, विकास परवानगी प्रकरणांचा निपटारा जलद गतीने व पारदर्शकपणे होण्यासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणी वेळेत दूर करण्याबाबत बाजू ऐकून घेण्यात आल्या होत्या. बैठकीत विकास परवानगी प्रकरणी यापुढे केवळ १ जून २०२२ पासून परवानाधारक आर्किटेक, इंजिनीयर तसेच त्यांचे उपस्थित प्रतिनिधी यांना ऑनलाइन पद्धतीने प्रकरणे दाखल करण्याचे सुचविण्यात आले होते. तसेच बांधकाम परवानगी प्रकरणी बांधकाम परवानगी मिळाल्यानंतर जर बांधकाम परवानगी नकाशानुसार केलेले नसेल तर अशा प्रकरणी बांधकाम पूर्णत्वाचा दाखल्यास मनपा प्रशासनाकडून मान्यता मिळणार नाही. अशाही सूचना बैठकीत करण्यात आल्या होत्या.

JMC Commissioner Vidya gaikwad with officials
22 वर्षांच्या गॅप नंतर दहावी उत्तीर्ण; आई व मुलाने सोबत मिळविले यश

प्रत्यक्ष आयुक्तांकडून पाहणी महापालिका आयुक्त श्रीमती विद्या गायकवाड यांनी नगररचना विभागात बांधकाम पूर्णत्वाच्या दाखल्याप्रकरणी आलेल्या प्रकरणांची प्रत्यक्ष साइटवर जाऊन पाहणी केली. त्यावेळी त्यांनी बांधकाम स्थळ निरीक्षण केले. काही ठिकाणी त्यांना प्रत्यक्ष नकाशा व बांधकामात फेरफारही आढळून आला. तर पूर्णत्वाचा दाखला नाही आयुक्त विद्या गायकवाड यांनी आदेश दिले, की यापुढे जर जळगाव शहरातील नागरिकांस, वास्तुविशारद, आर्किटेक इंजिनिअर यांना बांधकाम परवानगी ही बांधकाम प्रकरणी घ्यावयाची असेल तर परवानगी मंजूर नकाशानुसार बांधकाम करावे, जर नकाशानुसार बांधकाम झालेले नसेल तर बांधकाम पूर्णत्व दाखल्यास प्रशासनाकडून यापुढे मान्यता दिली जाणार नाही.

JMC Commissioner Vidya gaikwad with officials
महाज्‍योतीतर्फे 100 विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com