Jalgaon Municipality: मनपाच्या सुविधा, आवाहने आता सोशल मीडियावर!

‘आता मी काय करु?’सह ‘जेसीएमसी डिजिटल’ प्रकल्पाला अभिनेत्यांच्या शुभेच्छा
Jalgaon Municipal Corporation
Jalgaon Municipal Corporationesakal

Jalgaon Municipality : महापालिकेच्या विविध ५६ विभागांमार्फत पुरविण्यात येणाऱ्या नागरी सुविधांबाबत मार्गदर्शन करणाऱ्या ‘आता मी काय करु?’ या ५६ भागांच्या चित्रफितीचे, तसेच महापालिकेकडून करण्यात येणाऱ्या आवाहनांना विविध सोशल मीडियांवर दर्शविणाऱ्या ‘जेसीएमसी डिजिटल’ या प्रकल्पाचे लोकार्पण सोमवारी (ता. २) करण्यात येणार आहे. (Jalgaon Municipal corporation facilities appeals now on social media)

या वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या लोकार्पणानिमित्त मराठी सिनेअभिनेत्यांनी मनपा प्रशासनास, तसेच जळगावकरांना शुभेच्छा दिल्या आहेत.

या विभागांची सेवा अंतर्भूत

महानगरपालिकेतर्फे विविध ५६ विभागांमार्फत पुरवण्यात येणाऱ्या नागरी सेवा, जसे- जन्म दाखला, मृत्यु दाखला, बांधकाम परवानगी, नळ जोडणी आणि यासारख्या अन्य कामांसाठी नागरिकांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन कोणत्या कामासाठी कोणत्या विभागात जावे, त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात आणि त्या कामासाठी लागणारे शासकीय शुल्क आदींची इत्यंभूत माहिती ‘आता मी काय करू’ या व्हिडीओ मालिकेत आहे.

या ५६ व्हिडिओजच्या मालिकेतील प्रथम १७ व्हिडिओ सोमवारी महानगरपालिकेच्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरुन प्रसारित करण्यात येतील.

Jalgaon Municipal Corporation
Cleanliness Drive: सिन्नर बस टर्मिनल चिमुकल्यांकडून चकाचक! ‘स्वच्छतेसाठी एक तारीख, एक तास’ या उपक्रमात श्रमदान

यांची आहे निर्मिती

या व्हिडिओची निर्मिती एन. व्ही. टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांची असून, रिंग रोड स्थित क्रिएटर्स अकॅडमी अँड स्टुडिओ या ठिकाणी चित्रित करण्यात आले आहे. याची संकल्पना आणि लेखन निलेश वर्मा यांचे आहे.

पुणे येथील मनुश्री बिहाडेसह स्थानिक कलाकार ऋषिकेश धर्माधिकारी, उज्वला वर्मा, संदीप केदार, दीपक महाजन या अनुभवी कलाकारांनी यात सहभाग घेतला आहे. दिग्दर्शन प्रशांत सोनवणे यांचे, तर कला दिग्दर्शन हर्षदा गावडे यांनी केले आहे.

मेकअप किरण अडकमोल, कॅमेरा अक्षय परांजपे, सहायक कॅमेरा ओंकार शिंदे, संकलन सुहास चोगले यांचे आहे.

या अभिनेत्यांच्या शुभेच्छा

व्हिडिओ मालिकेच्या प्रचार आणि प्रसारासाठी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज सिने अभिनेते सुबोध भावे, विजय पाटकर, अभय कुलकर्णी आणि इतर अनेक कलाकारांनी शुभेच्छा आणि आवाहन असलेले व्हिडिओ संदेश दिले आहेत.

Jalgaon Municipal Corporation
Nashik News: खैरगव्हाण सरपंचपदी माया पोटे विजयी! राजकीय गटबाजीत समान मते मिळाल्याने चिठ्ठीत उघडले नशीब

दुसऱ्या प्रकल्पात मनपाची आवाहने

महानगरपालिकेतर्फे वेळोवेळी पुरविण्यात येणाऱ्या सेवा सुविधांची, योजना, पाणीपुरवठा वेळापत्रकात होणारे बदल आदींची माहिती नागरिकांना त्वरित मिळावी यासाठी महापालिकेने फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रामवर खाते सुरू केले असून नागरिकांनी ‘जेसीएमसी डिजिटल’ या नावाने खाते शोधून त्यास लाईक आणि फॉलो करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

अशी आहे व्यवस्था

महापालिकेचे सोशल मीडिया खाते हाताळण्यासाठी एका तज्ज्ञ टीमची व्यवस्था करण्यात आली असून, या टीमद्वारे सोशल मीडिया खात्यांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे.

सोशल मीडिया व्यवस्थापन क्षेत्रात मोठा अनुभव असलेली शहरातील प्रसिद्ध डिजिटल मार्केटिंग कंपनी एनव्ही टेक्नॉलॉजी सर्व्हिसेस यांच्या सीएसआर उपक्रमाच्या माध्यमातून तीन वर्षांसाठी महापालिकेचे सोशल मीडिया खाते मोफत हाताळण्यात येणार आहे.

Jalgaon Municipal Corporation
Nashik News: महापालिकेची स्वच्छता ही सेवा अभियानद्वारे चमकोगिरी! शहरात कचऱ्याचे ढिगारे; दुर्गंधीचे साम्राज्य

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com