Jalgaon Municipal Election
esakal
जळगाव : महापालिका निवडणुकीत (Jalgaon Municipal Election) भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये चांगलीच स्पर्धा दिसून आली. यात तिकीट न मिळाल्याने इच्छुक उमेदवारांनी बंडखोरी करून निवडणुकीत भाजपच्याच उमेदवारांपुढे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे भाजपने (BJP) पक्षशिस्त भंग केल्याप्रकरणी माजी नगरसेवक जितेंद्र मराठेंसह २७ जणांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. ही कारवाई महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केली आहे.